केरळच्या आपत्तीचा संत्र्याला फटका

Orange
Orange

नागपूर - केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा विदर्भातील संत्र्यांनाही फटका बसला असून आंबिया बहाराचे दर निम्म्यावर आले आहेत.

गेल्यावर्षी ४० ते ४५ हजार रुपये टन असलेला संत्रा यावर्षी २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.  दिल्ली आणि बांगलादेशकडून येत्या काळात मागणी वाढण्याची शक्‍यता असल्याने तेजीची अपेक्षा केली जात आहे. 
देशात नऊ लाख हेक्‍टर तर एकट्या विदर्भात दीड लाख हेक्‍टरवर लिंबूवर्गीय फळपिकांची  लागवड होते. त्यामाध्यमातून संत्रा लागवडीत विदर्भाने राज्यात आघाडी घेतली आहे. मृग आणि आंबिया बहारातील संत्रा फळांची उत्पादकता या भागात होते. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत आंबीया बहारातील संत्रा फळे बाजारात दाखल होतात. परंतू गेल्या काही वर्षांपासून थोडा हिरव्या सालीचा आणि आंबटगोड चवीच्या संत्रा फळांची  मागणी केरळकडून होऊ लागली.
 या माध्यमातून मोठी बाजारपेठ हंगामाच्या सुरवातीला आंबीया बहारातील फळे घेणाऱ्या संत्रा उत्पादकांसाठी उपलब्ध झाली होती. परंतु, यावर्षी केरळला पुराचा फटका बसला आणि संत्रा उत्पादकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले.

 ‘केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथून मागणीच नाही. परिणामी यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कमी भावात संत्रा विकावा लागत आहे. दिल्ली आणि बांगलादेशकडून ऑक्‍टोबरपासून मागणी वाढल्यानंतर ही परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा आहे. 
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेज

सप्टेंबरमध्येच उपलब्ध होतात हिरवी फळे
ऑक्‍टोबर ते डिसेंबर असा आंबिया बहारातील संत्रा फळांच्या उपलब्धतेचा हंगाम आहे. परंतु, केरळची मागणी हिरव्या सालीच्या संत्र्याची असल्याने त्यानुसार सप्टेंबमध्येच ही फळे मिळावी याकरिता शेतकरी तशाप्रकारे बागेचे व्यवस्थापन नजीकच्या काळात करू लागले, अशी माहिती महाऑरेजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली. 

दिल्ली आणि बांगलादेशकडून होणार मागणी
दिल्ली मार्केटला पिवळसर रंग आणि गोडवा असलेल्या संत्रा फळांची मागणी राहते. बांगलादेशदेखील विदर्भातील संत्र्यांचा मोठा खरेदीदार आहे. त्यांच्याकडून सध्या एक-दोन ट्रकचीच निर्यात होत आहे. त्यामुळे संत्रा दर प्रभावीत झाले आहेत. गेल्यावर्षी ४० ते ४५ हजार रुपयांवर असलेले दर यावर्षी २५ ते ३० हजारावर आले आहेत. रिलायन्स, ऑल फ्रेश, बिग बाजार यांच्याकडूनदेखील संत्रा फळांना मागणी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com