विजेच्या धक्क्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सचिन गेटमे (वय 31,रा. मॉर्डन स्कूल रोड, मानकापूर) हे वाहतूक पोलिस शाखेत कार्यरत होते. घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना मोटर अचानक बंद पडली.

नागपूर - पाण्याची मोटर दुरूस्त करीत असताना अचानक लागलेल्या वीजेच्या धक्क्यामुळे पोलिस शाखेत कार्यरत असलेल्या सचिन गेटमे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सचिन गेटमे (वय 31,रा. मॉर्डन स्कूल रोड, मानकापूर) हे वाहतूक पोलिस शाखेत कार्यरत होते. घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना मोटर अचानक बंद पडली.

आज (सोमवार) सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील मोटर दुरूस्त करीत होते. उघड्या वायरला त्यांच्या हाताचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जबर धक्‍का बसला. विजेच्या धक्‍क्‍याने ते फेकल्या गेल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना शेजाऱ्यांनी खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले.