कारच्या धडकेत पोलिस शिपायी ठार

अनिल कांबळे
सोमवार, 23 एप्रिल 2018

नागपूर: पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने एका शिपायाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्रदीप गणपतराव उईके (३४) असे मृत शिपायाचे नाव आहे. तर अजय प्रभाकर पाटील (४२) रा. नेहरु कॉलनी, अनंतनगर असे जखमी शिपायाचे नाव आहे. 

प्रदीप हे वाडी पोलिस ठाण्यांत कार्यरत होते. रविवारी रात्री ९.३० वाजेपासून ते रात्रपाळीला काम करित असताना सहकारी अजय यांच्यासोबत वडधामना येथे पेट्रोलिंगसाठी गेले होते. रात्री १२.३० च्या सुमारास ते वडधामना वरून पेट्रोलिंग करित आठवा मैल परिसराकडे येत असताना एमएच-३१, सीएस-१८५३ क्रमांकाच्या झायलो कारने मागून जोरदार धडक दिली. 

कारचा चालक हर्षदीपसिंह देवेनसिंह आनंद (३७) (रा. हर्षविला, हिलरोड) याने मद्य प्राशन केले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली. 

Web Title: Police killed in a accident