कंत्राटदाराला 69 लाखांचा चुना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नागपूर - भूमिगत केबल टाकण्याचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला खासगी कंपनीच्या संचालकांनी आणि बॅंक व्यवस्थापकाने 69 लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी एमबी टाउन, झिंगाबाई टाकळी निवासी गणेश गंगाप्रसाद तिवारी (52) यांच्या तक्रारीवरून एचडीएफसी सदर शाखेच्या कर्ज विभागाचे व्यवस्थापक आणि दिल्लीतील जियो ट्रेंचलेस इक्विपमेंट प्रा. लि. कंपनीचे संचालक सचिन शर्मा, मनीषा सचिन शर्मा, राजेश आणि शिल्पी चौहान यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तिवारी हे भूमिगत केबल टाकण्याचे काम करतात. याकामासाठी त्यांना एचडीडी मशीनची आवश्‍यकता होती. सप्टेंबर 2016 मध्ये त्यांना दिल्लीतील जियो इक्विपमेंट कंपनीची जाहिरात दिसली. त्यांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क केला. या मशीनची किंमत 54.46 लाख रुपये होती. मशीन खरेदीसाठी त्यांनी एचडीएफसी बॅंकेच्या सदर शाखेत अर्ज केला. कर्ज विभागाचे व्यवस्थापकाने त्यांना 54.46 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. यानंतर गणेश यांनी 15 लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून कंपनीच्या खात्यात जमा केले. मात्र, मशीनची डिलिव्हरी मिळण्यापूर्वीच बॅंकेच्या व्यवस्थापकाने परस्पर संपूर्ण रक्कम आरोपींच्या खात्यात जमा केली. संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतरही आरोपींनी गणेश यांना मशीन दिली नाही. त्यांनी याबाबत संचालकांना विचारणा केली असता ते टाळाटाळ करू लागले. बॅंकेत गेल्यावर गणेश तिवारी यांना समजले की, कंपनीच्या खात्यात आधीच संपूर्ण रक्कम जमा झालेली आहे. त्यांना धक्काच बसला. त्यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. 

Web Title: private company directors and the bank manager for Rs 69 lakhs

टॅग्स