अभियांत्रिकी प्रवेशाचे "ऍलॉटमेंट' जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

नागपूर - अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षासाठी "फॅसिलिटेशन सेंटर‘द्वारे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला होता. तसेच, पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर संचालनालयाकडून प्रवेशाची अधिसूचना आणि पहिली ऍलॉटमेंटही यादीही जाहीर झाली आहे. 

तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्‍निक) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळतो. प्रथम वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर, थेट द्वितीय वर्षासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. पुढील प्रवेशप्रक्रियेची अधिसूचना अखेर तंत्रशिक्षण संचालनालया(डीटीई)कडून जाहीर झाली आहे. अधिसूचनेनुसार ज्या विद्यार्थ्यांना जागा वाटप झाल्या आहेत. त्यांनी शासकीय महाविद्यालयांतील एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग करायचे आहे. चौथ्या फेरीचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने पर्याय भरता येतील. त्यानंतर पुढील प्रवेशप्रक्रिया होईल.
 
अशी होईल प्रवेशप्रक्रिया
17 ते 18 ऑगस्ट -एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग
19 ऑगस्ट-दुसऱ्या फेरीचा निकाल
20 ते 22 ऑगस्ट-एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग
23 ऑगस्ट- तिसऱ्या फेरीचा निकाल
24 ते 25 ऑगस्ट- एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग
26 ऑगस्ट- चौथ्या फेरीसाठी जागावाटप

Web Title: Public access to engineering "allotment"