चिमुकल्यांना आज "दो बूंद जिंदगी के'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

नागपूर - पाच वर्षांखालील चिमुकल्यांना उद्या रविवार (ता. 29) शहरातील विविध आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयांत पल्स पोलिओ लस देण्यात येणार आहे. मनपा हद्दीत दहा झोनल वैद्यकीय अधिकारी व आरोग्य निरीक्षक ही मोहीम राबविणार आहेत. सकाळी सात वाजतापासून मोहिमेला प्रारंभ होणार आहे. दोन लाखांवर चिमुकल्यांना पोलिओची लस देण्यासाठी महापालिकेचे पथक मंदिर, मशीद, मॉल्स, रेल्वेस्थानक, विमानतळ, अतिजोखीमग्रस्त भाग, बांधकाम, वीटभट्ट्यांवर जाणार आहे. भटक्‍या जमातींची मुले, रस्त्यावरील मुले, अनाथालयातील मुलांना पोलिओ डोस पाजला जाणार आहे. एवढेच नव्हे रात्रीदेखील पथक चिमुकल्यांच्या शोधात फिरणार आहे.
Web Title: Pulse Polio Vaccine