सख्या बापाचा मुलीवर बलात्कार; नराधम बापाला अटक 

अनिल कांबळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - आईला व भावाला मारून टाकण्याची धमकी देत दारूड्‌या बापानेच सख्या मुलीवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना एमआयडीतील झोपडपट्‌टीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. 

नागपूर - आईला व भावाला मारून टाकण्याची धमकी देत दारूड्‌या बापानेच सख्या मुलीवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना एमआयडीतील झोपडपट्‌टीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. 

आरोपी बाप हा पेंटर आहे. त्याला पत्नी, मुलगी आणि मुलगा आहे. मुलगी आठव्या वर्गात शिकते तर मुलगा चवथ्या वर्गात शिकतो. पत्नी ही घरोघरी जाऊन होम पेशेंट सर्व्हिस देते. गेल्या वर्षभरापासून दारूड्या बापाची विकृत नजर मुलीवर पडली. पत्नी घरी नसताना त्याने तिच्याशी अनेकदा अश्‍लिल चाळे केले. कुणालाही सांगितल्यास आईला आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. नराधमाची हिम्मत वाढल्यानंतर 8 एप्रिलला शाळेतून घरी आलेल्या मुलीशी अश्‍लिल चाळे सुरू केले. मुलीने विरोध दर्शविल्यानंतर तो दारू पिण्यासाठी बाहेर निघून गेला. सायंकाळी परत आल्यानंतर त्याने बळजबरीने मुलीला घरात नेले. तिच्यावर एकदा नव्हे तर तिनदा बलात्कार केला. भाऊ आणि आईच्या जीवाच्या भीतीपोटी ती कुणालाही सांगत नव्हती. मात्र, गुरूवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास पत्नी व मुलगा झोपल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. तेवढ्यात पत्नीला जाग आला. तिने चित्र पाहताच विश्‍वासच बसत नव्हता. मात्र, तिने मोठ्या हिमतीने घरातील काठी घेतली आणि नवऱ्याला झोडपले. त्यानंतर त्याच्याशी भांडण करून जाब विचारला.

दुसऱ्या दिवशी तिने आपल्या नातेवाईकांना बोलवून प्रकार लक्षात आणून दिला. पोलिसांत तक्रार करण्याचे निर्णय झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून नराधम बापास अटक केली.

Web Title: rape crime