वर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मंत्र्यांना निवेदन

राजेश सोळंकी
गुरुवार, 24 मे 2018

शेतीपूरक उद्योग करावे असा सल्ला नेहमीच शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जातो. त्या अनुषंगाने दुग्धव्यवसाय हा अतिशय महत्वपूर्ण शेतीपूरक उद्योग म्हणून बघितला जातो. कारण त्यातून शेतकऱ्यांना रोज उत्पन्न मिळते. परंतु, सध्या वर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी विविध अडचणींना सामोरे जातोय.

आर्वी (वर्धा) - तीपूरक उद्योग करावे असा सल्ला नेहमीच शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जातो. त्या अनुषंगाने दुग्धव्यवसाय हा अतिशय महत्वपूर्ण शेतीपूरक उद्योग म्हणून बघितला जातो. कारण त्यातून शेतकऱ्यांना रोज उत्पन्न मिळते. परंतु, सध्या वर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी विविध अडचणींना सामोरे जातोय. ह्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे सुपुत्र व भूमीपुत्र संघर्ष वाहिनी या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. अभिजित फाळके पाटील यांनी मंत्रालयात पशु व दुग्धविकास मंत्री मा.ना.महादेवजी जानकर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून वर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अडचणींचे निवेदन दिले. 

दुधाची सरसकट आधारभूत किंमत प्रति लिटर रु.३१ एवढी असावी. देवळी तालुक्यातील 
टाकळी(चणा), ममदापुर आणि हिंगणघाट तालुक्यातील डौलापूर, पोटी, खानगाव, साटी, भैय्यापुर, कोसुर्ला या गावांमध्ये मदर्स डेअरी चे केंद्र सुरु करण्यात यावे.

 वर्धा येथे दुधाचे चिलिंग प्लांट सुरु करन्यात यावा. कारंजा तालुक्यातील किन्हाळा, हेटी, दानापूर व बोथली या गटग्रामपंचायतीमध्ये दूधविक्रीसंकलन केंद्र स्थापन करून गावकऱ्यांचे होणारे स्थलांतर थांबवावे. अशा मागण्या निवेदणातून करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने शासन दरबारी ठेवून त्या सोडवण्याचा भूमिपुत्र संघर्ष वाहीनीचा प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने आज दूधउत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मा. मंत्र्यांसमोर ठेवण्यात आले. हे प्रश्न जर सोडवण्यात आले नाहित तर १ जून पासून होणाऱ्या शेतकरी संपात भूमिपुत्र संघर्ष वाहिनी सुद्धा सामिल होईल असा ईशाराही भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके पाटील यांनी यावेळी दिला.

Web Title: request Minister for problems related to milk producers in Wardha district