ओझे कमी करण्यासाठी ऋग्वेदचे उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

नागपूर - चंद्रपूरच्या विद्यानिकेतन शाळेतील मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत लॉकर्स व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही सुविधा महाराष्ट्रातील इतरही विद्यार्थ्यांना मिळावी आणि दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून (२ ऑक्‍टोबर) संविधान चौकात ऋग्वेद राईकवारने उपोषण सुरू केले आहे.

दप्तराचे वजन कमी करण्यासाठी हायकोर्टाने विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन १० टक्के असावे, असे निर्देश सरकारला दिले. मात्र, आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

ऋग्वेद हा चंद्रपूरच्या विद्यानिकेतन या सीबीएसई शाळेतील सहाव्या वर्गातील विद्यार्थी आहे. त्याला रोज आठ विषयांची पुस्तके, वह्या असे ८ किलो वजनाचे दप्तर शाळेत घेऊन जावे लागायचे. या विरोधात आंदोलन केल्यावर शाळेतच लॉकर उपलब्ध करून देण्यात आले. आता राज्यातील शाळेतही अशाच प्रकारचे लॉकर उपलब्ध करून द्यावे, यासाठी त्याने शाळाशाळांमध्ये फिरून दप्तराचे ओझे कमी करण्याचे आवाहन केले.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. जोपर्यंत दप्तराचे ओझे कमी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ऋग्वेदने दिला आहे. पालकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्याने केले आहे.

सीबीएसई शाळा शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत नसल्याने त्यावर कारवाई करणे शक्‍य नाही. तसेच सीबीएसईद्वारे तयार केलेल्या पुस्तकांसंदर्भात काहीही करता येणे अशक्‍य आहे. ऋग्वेदची काळजी असून, त्याअनुषंगाने स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जे करता येणे शक्‍य आहे, ते निश्‍चित केल्या जाईल.
-विनोद तावडे, शिक्षणमंत्री

टॅग्स