‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा आज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नागपूर - ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचा चौदावा वर्धापनदिन उद्या (शुक्रवार) थाटात  साजरा होणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पाच ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार, ‘सकाळ’ सोशल कल्चरल क्‍लबचा शुभारंभ आणि ‘नक्षत्रनाद’च्या निमित्ताने बहारदार सांस्कृतिक मेजवानी असे भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत.

सिव्हिल लाइन्स येथील  डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. महापौर नंदा जिचकार, महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. टीजेएसबी सहकारी बॅंक लिमिटेड आणि नाथे बुक डिस्ट्रिब्युटर्स या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी किशोर कुळकर्णी, ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. भाऊराव भट (लाडसे), सुप्रसिद्ध कथ्थक नृत्य कलावंत भूपेश मेहर आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार मोरेश्‍वर निस्ताने यांना गौरविण्यात येणार आहे. 

विदर्भाचे संपूर्ण सांस्कृतिक विश्‍व एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने ‘सकाळ सोशल कल्चरल क्‍लब’ची स्थापना करण्यात आली असून उपस्थित पाहुणे आणि सत्कारमूर्ती यांच्या हस्ते क्‍लबचा शुभारंभ होणार आहे. नागपूरच्या मातीतील कलावंतांचा ‘नक्षत्रनाद’ हा बहारदार कार्यक्रम यंदाचे वैशिष्ट्य असेल. नागपुरातील गायक, वादक, शास्त्रीय नर्तक, व्यावसायिक व हौशी चित्रकार ‘नक्षत्रनाद’च्या निमित्ताने प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत.

Web Title: sakal anniversary