"सकाळ'च्या वर्धापनदिनी "नक्षत्रनाद' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

नागपूर - "सकाळ'चा वर्धापनदिन म्हणजे बहारदार मनोरंजनाची मेजवानी, हे कुणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. यंदा याच मालिकेत सर्व कलांचा अनोखा मिलाफ नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. यंदा "सकाळ'ची विदर्भ आवृत्ती पंधराव्या वर्षांत पदार्पण करीत असून, तारुण्याच्या उंबरठ्यावरील हा क्षणही "नक्षत्रनाद'ने सजलेला असेल. 

नागपूर - "सकाळ'चा वर्धापनदिन म्हणजे बहारदार मनोरंजनाची मेजवानी, हे कुणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. यंदा याच मालिकेत सर्व कलांचा अनोखा मिलाफ नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. यंदा "सकाळ'ची विदर्भ आवृत्ती पंधराव्या वर्षांत पदार्पण करीत असून, तारुण्याच्या उंबरठ्यावरील हा क्षणही "नक्षत्रनाद'ने सजलेला असेल. 

सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात येत्या 10 मार्चला सायंकाळी 6.30 वाजता हा "सकाळ'चा वर्धापनदिन सोहळा होणार आहे. यानिमित्ताने नाग-विदर्भाच्या आसमंतात लख्ख उजळणारी नक्षत्रे एका व्यासपीठावर येणार आहेत. गायन, नृत्य, चित्रकला, नाट्यकृतीने नटलेला "नक्षत्रनाद' हा कार्यक्रम नागपूरकरांना अद्‌भुत आनंद देणारा ठरणार आहे. नागपूरच्या मातीतील अनेक कलावंत यावेळी आपापल्या कला क्षेत्रातील रंग उधळतील. डोळे दीपविणारा भरतनाट्यमचा आविष्कार, रोमांच उभा करणारी बासरी आणि चित्रकलेची अभूतपूर्व जुगलबंदी, हृदयाला स्पर्श करणारे मधुर स्वर, पोट धरून हसविणाऱ्या नकला असे मनोरंजनाचे अफलातून पॅकेज नागपूरकरांना मिळणार आहे. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात नागपुरातील युवा चित्रकारसुद्धा आपल्या कॅनव्हासवर सप्तरंग उधळताना दिसतील, हे विशेष. यंदाचा वर्धापनदिन विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. अधिकाधिक रसिकांनी या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आपण सादर आमंत्रित आहात 
शुक्रवार, 10 मार्च 2017 
स्थळ ः डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स 
वेळ ः सायंकाळी. 6.30 वाजता 

विदर्भ

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त  नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017