शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

डिगडोह - शिवाजी महाराज राज्याभिषेक, माँ भवानी शिवाजी महाराजांना तलवार भेट देताना, हिंदवी स्वराज्याची शपथ, पुष्पवर्षाव करणारी तोफ आदी देखाव्यांतून ‘शिवरायांचे आठवावे रूप , शिवरायांचा आठवावा प्रताप’ या उक्‍तीला साजेसी वेशभूषा परिधान केलेली रथात बसलेली बच्चेकंपनी आदी देखाव्यांसह शोभायात्रा काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी(ता.१५) तालुक्‍यात विविध कार्यक्रम पार पडले. नाका ते हिंगणा अशी सात किलोमीटरची शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय प्रबोधनकार आर. डी. जोगदंड यांचे व्याख्यान झाले.

हिंगणा तालुका शिवसेनेच्या वतीने हिंगणा मार्गावर ठिकठिकाणी ब्रह्मनाद पथकांचे कार्यक्रम सादर करण्यात आले. दुपारी देखाव्यांसह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचा समारोप हिंगणा येथील शिवाजी पुतळ्याजवळ झाला. यानंतर प्रबोधनकार जोगदंड यांचे व्याख्यान झाले. 
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्‍नमंजूषा परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी शिवाजी मर्दानी तालीम पथकाने कलाप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर, हिंगण्याच्या नगराध्यक्ष मीनाक्षी ढोले, विधानसभा संघटक रवी जोडांगळे, तालुकाप्रमुख नंदू  कन्हेर, ज्येष्ठ शिवसैनिक विजय नाटके, जगदीश कन्हेर, संतोष कन्हेरकर, विष्णू कोल्हे, अमित भोयर, हरीभाऊ चिंचपुरे, राजेंद्र कोल्हे, राहुल बागडे, गजानन काकडे, शुभम बुराडे, गौतम गोस्वामी, दिनेश भुते, प्रेमशंकर जांभूतकर, विजय सरदार, अतुल करंडे, गजानन लाड, शैलेश ठाकरे, मनीष गिरी, उमेश राऊत, संतोष कटरे आदींची उपस्थिती होती. संचालन रचना कन्हेर , दीपलक्ष्मी लाड, अर्चना झलके यांनी केले.

Web Title: shivjayanti celebration