नागपुरात शिवसैनिकांचा पेढे भरवून आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

नागपूर - महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राज्यात भाजपशी कुठेही युती करायची नसल्याचा आदेश आल्यानंतर नागपुरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे.

नागपूर - महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राज्यात भाजपशी कुठेही युती करायची नसल्याचा आदेश आल्यानंतर नागपुरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारी रोजी भाजपसोबत युती तोडण्याची घोषणा केली. शिवसेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांच्या नेतृत्वात रेशीमबाग येथील शिवसेनेच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव व्यक्त करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. हरडे यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरविले. काही शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

भाजपने नागपुरात शिवसेनेशी युती न करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने नागपुरात युती करण्याचा प्रस्तावही सेनेला दिला नव्हता, तरीही शिवसैनिकांनी युती तोडण्याच्या निर्णयाचे सहर्ष स्वागत केले आहे, हे विशेष.