धावत्या एसटीचे निखळले चाक

मोहन गायन
रविवार, 22 जुलै 2018

जामली (अमरावती) : धारणीहून जामलीमार्गे परतवाड्याकडे येणाऱ्या एसटी बसचे चाक अचानक निखळले; मात्र चालकाच्या समयसूचतेमुळे मोठा अपघात टळला.
मेळघाटात पाठविण्यात येत असलेल्या बसगाड्या पूर्णत: भंगार झालेल्या असून एसटी महामंडळ बसेस न तपासताच त्या पाठविल्या जातात. त्यामुळे एसटी बस रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मनात महामंडळाच्या बसेसविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

रविवारी (ता. 22) दुपारी दोनच्या सुमारास धारणीहून जामली मार्गे परतवाड्याकडे येणाऱ्या भरधाव बसचे चाक बेरिंगमधून सटकल्याने निखळले. सुदैवाने चालकाच्या समयसूचतेमुळे अपघात टळला; अन्यथा बसमधील 30 ते 40 प्रवाशांचे जीव धोक्‍यात आले असते. घडलेल्या प्रकाराबद्दल आगारप्रमुख बल्लाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: ST bus accident

टॅग्स