नागपूर दर्शन सहलीचा त्वरित प्रारंभ करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नागपूर - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महापालिकेने पुढाकार घेऊन नागपूर दर्शन सहल तत्काळ सुरू करावी, असे आदेश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. शहर, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाइडला प्रशिक्षण द्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.

नागपूर - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महापालिकेने पुढाकार घेऊन नागपूर दर्शन सहल तत्काळ सुरू करावी, असे आदेश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. शहर, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाइडला प्रशिक्षण द्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट दिल्यानंतर रावल यांनी नागपूर दर्शन सहलीसोबतच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीसाठी "कॉपी टेबल बुक‘ विदर्भातील पर्यटन "मोबाईल ऍप‘ तयार करण्याचे आदेश दिले. नागपूर दर्शन सहलीसाठी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुढाकार घ्यावा. तसेच गाइडला खासगी ऐतिहासिक इमारती व विदर्भातील प्रसिद्ध खाद्य, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना, पर्यटकांना वास्तविक माहिती उपलब्ध करून द्यावी व प्रशिक्षण द्यावे, असेही सूचित केले. 

नागपुरात देशी व विदेशी पर्यटकांना तीन दिवस पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी सर्किट तयार करावे. त्यासाठी 50 ते 100 किलोमीटर अंतरावरील पर्यटनस्थळांना भेटी, पर्यटकांना आकर्षित करावेत. त्यात जलक्रीडा, जंगल सफारी, साहसी पर्यटनाच्या योजना राबवाव्यात.

बैठकीला मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, एमटीसीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे, वास्तुविशारद निशिकांत भिवगडे, सहायक अभियंता सुरेश साखरवाडे, ताडोबा पर्यटक निवासाचे व्यवस्थापक महादेव हिरवे, सुधाकर सराटे उपस्थित होते.

कृषी पर्यटनासह नवी आकर्षक ठिकाणे पर्यटकांपर्यंत पोहोचवावीत. त्या स्थळांना प्रसिद्धी द्यावी. एमटीडीसीला शासनाकडून नाममात्र भाडेपट्ट्याने जमीन मिळते. त्यानुसार विदर्भातील पाटबंधारे विभागाची जमीन व तलाव जलक्रीडा केंद्र सुरू करण्यासाठी नाममात्र भाडेपट्ट्याने देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. 

जयकुमार रावल, पर्यटनमंत्री.

विदर्भ

नांदुरा (बुलडाणा) : मका पिकाला कीटकनाशक देऊन घरी परतलेल्या ९ महिला शेतमजुरांना 'कार्बोमाईन' नावाच्या कीटकनाशकांचा...

09.51 AM

चिखली जि. बुलडाणा : शौचास जाणाऱ्या नवऱ्यावर गुड माॅर्निंग पथकाने कारवाई केली म्हणून अपमान सहन न झाल्याने पत्नी पार्वती शंकर...

09.33 AM

अंध विनोद उकेची कैफियत - एंजिओग्राफीसाठी पाच हजार कोठून आणू? नागपूर - सुपर स्पेशालिटीत आमदार गिरीश व्यास रुग्णांच्या...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017