निकालातील घोळामुळे विद्यार्थी संतप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

अमरावती - अभियांत्रिकीच्या ऑनलाइन निकालात माइंड लॉजिक कंपनीने केलेल्या घोळामुळे विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या संघटना चांगल्याच संतप्त झाल्या. आज, गुरुवारी युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना घेराव घालून त्यांच्या दालनातच अचानक ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी चुकीच्या निकालामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना द्यावी; अशी मागणी कुलगुरूंकडे केली. 

अभियांत्रिकीचे निकाल त्वरित लागावे म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एण्ड टू एण्ड प्रोग्राम कार्यान्वित केला. यासाठी बंगळूरच्या माइंड लॉजिक या कंपनीला परीक्षापूर्व व त्यानंतरची म्हणजे निकालापर्यंतची कामे दिली. गेल्या दोन वर्षांत या कंपनीने ४५ दिवसांच्या आत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा निकाल दिला नाही. यंदा तर कंपनीने निकालातील चुकांचा कळसच गाठला. या चुका दुरुस्त करण्यासाठी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व कुलसचिव डॉ. अजय देशमुख आणि परीक्षा विभागातील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. आंदोलनामध्ये मुन्ना अग्रवाल, नीलेश भेंडे, मंगेश कोकाटे, नीलेश परवार, ऋग्वेद सरोदेचा समावेश होता.

Web Title: student distressed by result scam