महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांची गळती

महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांची गळती

नागपूर - शहरात महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. शाळा बंद पडण्याचे सत्र काही वर्षात मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून, आतापर्यंत मनपाला निम्म्याने शाळा बंद कराव्या लागल्या. एकेकाळी मराठी माध्यमाच्या 80 असलेल्या शाळा 53 वर आल्या आहेत. तीच गत इतरही माध्यमांची आहे. पालकांचा कल कॉन्व्हेंटकडे वाढल्याने त्याचा फटका मनपाच्या शाळांना बसतो आहे.

नागपूर महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणे गौरवाची बाब समजली जायची. पण, बदलत्या काळानुरूप बदलांना आत्मसात करण्यात अपयश आले. खासगी शैक्षणिक संस्थांची भरमसाट शुल्क देण्याची ऐपत नसलेले आणि अत्यंत गरीब नागरिक आपल्या पाल्यांना मनपा शाळेत आणून सोडतात. प्रत्येक पालकाला आपले पाल्यही खासगी शाळेत जावे असे वाटते. पण, आर्थिक परिस्थितीमुळे असंख्य पालक मनपा शाळेत मुलांना आणून टाकतात. मात्र, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा प्राप्त होत नसल्याने अनेक विद्यार्थी माघारतात. 2013 मध्ये 34 हजार 160 असलेली विद्यार्थी संख्या 2016 मध्ये 23 हजारावर 591 वर आली. परिणामी, सोयी सुविधांअभावी मनपाच्या शाळांना टाळे लागत असताना विद्यार्थी संख्येलाही ओहोटी लागल्याचे वास्तव माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती कार्यकर्ते अभय कोलारकर यांना प्राप्त झाली.

तीन सहाय्यक शिक्षक निलंबित
2012 ते 2016 या दरम्यानच्या काळात किती शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे टर्मिनेशन, सस्पेंड व भ्रष्टाचाराबद्दल कार्यवाही करण्यात आली. याबाबतची माहिती विचारली होती. त्यात या दरम्यान 3 कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

वर्ष - मराठी - हिंदी- उर्दू
2012- 80- 67- 35
2013- 74- 66- 32
2014- 69- 66- 31
2015- 66- 64- 28
2016- 53- 58- 25
अनुदानित माध्यमिक शाळा - 17, विनाअनुदानित शाळा - 11

विद्यार्थी संख्या
2012- 23529
2013- 34160
2014- 32410
2015- 28182
2016- 23591

शिक्षकांची माहिती
वर्ष - प्राथमिक शाळा- माध्यमिक शाळा

2012- 1063- 358
2013- 1028- 353
2014- 1047- 350
2015- 948- 343
2016- 1005- 333

मिळालेले अनुदान (लाखात)
2012- 13- 3045.61
2013- 14 - 3069.10
2014- 15- 3557.47
2015- 16 - 3750.78
2016- 17 - 3552.34

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com