शालेय विद्यार्थ्यांच्या प्रेमाने गहिवरले वृद्ध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

केळवद - विद्यालयात शिक्षणासह विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मौजमस्तीसाठी विविध पर्यटन व धार्मिक स्थळांची सहल आयोजित करण्यात येते. मात्र, केळवदच्या भीमरावबापू देशमुख आदर्श विद्यालयाने एक अभिनव उप्रकम राबवत कळमेश्‍वर तालुक्‍यातील आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. एक दिवस वृद्धांसोबत राहून त्यांना भावनिक आधार दिला.

विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत संवाद साधला. त्यांच्या सुख-दु:खातील आठवणीत मग्न झाले. या वेळी वृद्धांनी वादविवाद स्पर्धा घेतली. ‘वृद्धाश्रम असावे की नसावे’ हा विषय होता. आयुष्यात आलेल्या दु:खामुळे वृद्धाश्रम असावे, अशा भावना काही वृद्धांनी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रम नसावे, यावर मते मांडत वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, आपल्या आईवडिलांना अखेरपर्यत सोबत ठेवून सांभाळ करण्याची शपथ यावेळी घेतली. 
विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या डब्यातून वृद्धांना घास भरविण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने एक बटाटा व एक कांदा सोबत आणला होता. सर्वांनी एकत्र गोळा केले. १०० किलो बटाटे, १००किलो कांदे यावेळी भेट देण्यात आले. एकूण ८४ वृद्धांना केळी व अल्पोपाहार वितरित करण्यात आला.

टॅग्स