अभ्यासाच्या तणावामुळे नागपूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

परीक्षा तोंडावर असताना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता अजनीत उघडकीस आली. हर्षवर्धन मनोज बुरिले (वय 12) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्यामुळे बुरिले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हसतमुख हर्षच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

नागपूर - परीक्षा तोंडावर असताना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता अजनीत उघडकीस आली. हर्षवर्धन मनोज बुरिले (वय 12) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्यामुळे बुरिले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हसतमुख हर्षच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

बुरिले अजनीतील विश्‍वकर्मा नगरात राहतात. ते खासगी चालक असून पत्नी अर्चना घरीच विद्यार्थ्यांच्या शिकवणी घेतात. हर्षवर्धन त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याचे हट्ट पुरविले जात होते. तो नरेंद्रनगरातील टायनी टॉटस शाळेतील सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होता. घरात ट्यूशन क्‍लासेससाठी विद्यार्थी येत असल्याने नेहमी अभ्यासाचे वातावरण असे. आई शिक्षिका असल्यामुळे हर्षच्या अभ्यासाकडे त्या गांभीर्याने लक्ष देत होत्या. मात्र, हर्षला अभ्यासाचे ओझे असह्य होत होते.

सहाव्या वर्गाची परीक्षा तोंडावर आल्याने दडपण अधिकच वाढले. आई-वडिलांच्या हर्षकडून अपेक्षा वाढल्या होत्या. हर्षने अभ्यासही मोठ्या धडाक्‍यात सुरू केला होता. मात्र, पुढे ताण वाढून त्याची घुसमट होऊ लागली. मात्र, तो कुणालाही सांगू शकत नव्हता. परीक्षेचे वेळापत्रक हाती आल्यानंतर अभ्यासात मागे पडल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्यावर तणाव वाढला होता. शनिवारी दुपारी वडील नोकरीवर गेल्यानंतर आई बाहेर गेली होती. हर्ष घरात एकटाच होता. त्याने अभ्यासाच्या टेबलावर उभे राहून सिलिंग फॅनला आईची ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दीड वाजता अर्चना घरी आल्यानंतर मुलाला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणारा शुभम बोचे याला आवाज देऊन हर्षला खाली उतरवले. काका प्रवीणच्या मदतीने मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पेलवेना अपेक्षांचे ओझे
वार्षिक परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते. परीक्षेचा ताण आणि पालकांच्या अतिअपेक्षा पाल्यांना पेलवत नाहीत. त्यामुळे मग आत्महत्येचा मार्ग स्वीकारून मोकळा होतो. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

 

Web Title: Students suicide under pressure of exam