तापमानात घट नागपूर @ 44.5

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नागपूर - गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेली विदर्भातील उष्णलाट बुधवारीही कायम राहिली. ढगाळ वातावरणामुळे नागपूरसह विदर्भात बहुतांश शहरांमधील कमाल तापमानात थोडीफार घट झाली, पण उकाडा कायम होता. हवामान विभागाने आणखी दोन दिवस उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने तापमान स्थिर राहण्याची किंवा त्यात थोडीफार वाढ होण्याची शक्‍यता आहे.

विदर्भवासींना मॉन्सूनचे वेध लागले असतानाच उन्हाचा तडाखा मात्र कमालीचा वाढलाय. दोन दिवसांपूर्वी मोसमातील उच्चांकावर (46.2 अंश सेल्सिअस) गेलेला पारा बुधवारी ढगाळ वातावरणामुळे 44.5 अंशांवर आला. विदर्भात उन्हाचे सर्वाधिक चटके ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे जाणवले. दोन्ही ठिकाणी विदर्भात सर्वाधिक 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदिया (44.6 अंश सेल्सिअस), वर्धा (44.4 अंश सेल्सिअस) आणि अकोलेकरही (43.6 अंश सेल्सिअस) उन्हाचे चटके व असह्य उकाड्याने दिवसभर त्रस्त होते. उन्हाच्या झळा सायंकाळी आणि उशिरा रात्रीपर्यंत जाणवत असल्याचे चित्र सध्या विदर्भात दिसून येत आहे.

Web Title: temperature decrease in nagpur