'बहोत तप रहा बाप!'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

ऊस विक्रेत्यांची कमाईसोबत काहिलीही
नागपूर - 'बहोत तप रहा बाप!' रामदासपेठेच्या रस्त्यावर उसाच्या रसाचे दुकान थाटलेला मूळचा झारखंडचा अनिल साव उद्गगारला. जेवढे जास्त ऊन तापेल, तेवढे जास्त ग्राहक त्याच्या दुकानावर गर्दी करतील; पण त्यालादेखील उन्ह सहन होत नसल्याचे जाणवले.

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी नागपूरचा पारा 42.8 अंश सेल्सिअस म्हणजे अर्ध्या अंशाने घसरला खरा; पण दाहकता थोडीशीही कमी नव्हती. चटके तर होतेच. उकाडाही भयंकर जाणवत होता. "यही तो कमाई का मौसम है साब' असं म्हणताना, तो घामही पुसत होता. नागपूर शहरात तब्बल 60 हजार स्ट्रीट व्हेंडर्स आहेत. त्यापैकी उन्हाळा असल्यामुळे हंगामी व्यवसाय करणारे ऊस विक्रेतेही शेकडो नव्हे तर हजारोंच्या घरात असू शकतात. त्यांच्यासाठी तसा भारी "ताप'च आहे.

देशातील हॉट दहांमध्ये चंद्रपूर, नागपूर, ब्रह्मपुरी
चंद्रपूर (43.2 अंश सेल्सिअस) शुक्रवारीही विदर्भात "हॉट' होते. गुरुवारी तेथील तापमानाने तर अक्षरश: कहरच केला होता. देशात सर्वाधिक तापमानाचा रेकॉर्ड या शहराने नोंदविला. उल्लेखनीय म्हणजे, देशातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांमध्ये पहिल्या तीन स्थानांवर विदर्भातील चंद्रपूर (44.2 अंश सेल्सिअस), नागपूर (43.3 अंश सेल्सिअस) आणि ब्रह्मपुरी (43.3 अंश सेल्सिअस) ही शहरे होती.