महामार्गावरील दोन अपघातांत तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

लाखनी (जि. भंडारा) - स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत महामार्गावर झालेल्या दोन अपघातांत तीन जण ठार झाले. या घटनेमुळे लाखनी परिसर चांगलेच हादरले.

लाखनी (जि. भंडारा) - स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत महामार्गावर झालेल्या दोन अपघातांत तीन जण ठार झाले. या घटनेमुळे लाखनी परिसर चांगलेच हादरले.

राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार/सडक जवळच्या तारा ढाब्यासमोर एम.एच.३५ पी. ५५३९ क्रमांकाची कार महामार्गावरील दुभाजकाला धडकली. या अपघातात यशदीप जयप्रकाश खन्ना  (वय ३८) व कुमुद कृष्णराव पाटील दोन्ही रा. गोंदिया हे दोघेही जागीच ठार झाले. तर, दुसऱ्या घटनेत ट्रॅव्हल्सच्या धडकेत मोटारसायकलचालक भानुदास सुरेश टिचकुले (वय ३७) रा. लाखोरी जागीच ठार झाले. पहिल्या घटनेतील यशदीप खन्ना हे नागपूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीवर होते. महिनाभरापूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या पायाचे हाड मोडले होते. त्यामुळे ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. चार दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते आपल्या ऑल्टो कारने कुमुद पाटील यांच्यासह स्वगावी गोंदिया येथे जात होते. 

दरम्यान, त्यांची भरधाव कार दुभाजकांवर आदळून पलटी झाली. यात कारचा चुराडा झाल्याने ते दोघेही जागीच ठार झाले. तर, दुसऱ्या घटनेत सुरेश  टिचकुले रस्ता ओलांडण्यासाठी मोटारसायकल घेऊन महामार्गावर उभा असताना त्याला साकोलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात तो जागीच ठार झाला.

Web Title: three death in highway accident