विहीरगाव परिसरात वाघाची दहशत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

देसाईगंज - तालुक्‍यातील विहीरगाव, चिखली रिठ, डोंगरगाव (हलबी), शिरपूर परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील १५ दिवसांपासून विहीरगाव परिसरात वाघ फिरत असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाने या परिसरात कॅमेरा ट्रॅपिंग केले. एका कॅमेऱ्यात वाघाचे छायाचित्र आल्याने वाघ इथेच असल्याचे स्पष्ट झाले. या परिसरातील गाय, शेळ्या यांच्यावर वाघाने ताव मारला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही माणसावर हल्ला केलेला नाही.

वनविभागाने या परिसरात बॅनर लावून वाघापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सावंगी, गांधीनगर परिसरात मागील एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे वाघ व बिबट्या या दोघांचाही बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी होत आहे.

विदर्भ

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

अकोला : सन २०१२ नंतर देशामध्ये सर्वच राज्यात जुलै २०१७ मध्ये पंचवार्षीक पशुगणना होणे अपेक्षीत होते. मात्र, केंद्राचे अनुदान आणि...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017