ट्रान्सफॉर्मर पेटले; आठ कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

देवळी (जि. वर्धा) - येथील औद्योगिक वसाहतीमधील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या पॉवर ग्रिडमधील ट्रान्सफॉर्मरला आज, गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत सुमारे आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या पॉवर ग्रिडमधून 765 केव्हीची लाइन औरंगाबादकडे गेली आहे. त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे. आगीत सात कोटी रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्मर आणि 35 हजार लिटर ऑइल नष्ट झाले. घटनास्थळी अग्निशमन पथक पाचारण करण्यात आले; पण पाण्याच्या माऱ्याने ऑइल बाहेर येऊन आगीचा भडका उडण्याच्या शक्‍यतेने अग्निशमन बंबांचा वापर टाळण्यात आला.

देवळी (जि. वर्धा) - येथील औद्योगिक वसाहतीमधील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या पॉवर ग्रिडमधील ट्रान्सफॉर्मरला आज, गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत सुमारे आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या पॉवर ग्रिडमधून 765 केव्हीची लाइन औरंगाबादकडे गेली आहे. त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे. आगीत सात कोटी रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्मर आणि 35 हजार लिटर ऑइल नष्ट झाले. घटनास्थळी अग्निशमन पथक पाचारण करण्यात आले; पण पाण्याच्या माऱ्याने ऑइल बाहेर येऊन आगीचा भडका उडण्याच्या शक्‍यतेने अग्निशमन बंबांचा वापर टाळण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ट्रान्सफॉर्मरमधील आग पेटतच होती. उद्या, शुक्रवारी आग विझल्यावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे पॉवर ग्रिडचे उपमहाव्यवस्थापक अनिलकुमार नाईक यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे एक सर्किट बंद पडले आहे. 

Web Title: transformers fire

टॅग्स