मच्छिंद्राच्या जंगलात आदिवासींचा सत्याग्रह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

वणी (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्‍यातील वनोजा व मच्छिंद्रा येथील आदिवासीबांधव गेल्या 15 दिवसांपासून मच्छिंद्राच्या जंगलात सत्याग्रहास बसले आहेत. परिसरातील आदिवासी व स्थानिक शेतकरीबांधवांचा शेतजमिनीत खड्डे खणण्यास विरोध आहे. वनविभागाला विरोध दर्शविण्यासाठी हा सत्याग्रह केला जात आहे. शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात हा लढा सुरू आहे.

वनोजा जंगलात अनेक वर्षांपासून मच्छिंद्रा येथील आदिवासी व स्थानिक शेतकरी पारंपरिक शेती करीत आहेत. वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत, यासाठी 2006 मध्ये वनाधिकार कायदा तयार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी कायद्यानुरूप दावे दाखल केले. न्याय मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी पांढरकवडा जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरणेदेखील दाखल केली. कायद्यानुरूप दावा दाखल केला असतानाही वनविभाग शेतात खड्डे खणत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात वनोजाच्या जंगलात 15 दिवसांपासून सत्याग्रह सुरू आहे. वनविभाग बळजबरीने शेतात खड्डे खणत असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. वनविभागाने शेतजमीन सोडून पडीक जमिनीवर वृक्षारोपण करावे, अशी मागणी किसान सभेने केली. यावेळी किसन मोहुर्ले, श्रीहरी लेनगुरे, सुधाकर सोनटक्‍के, सुनीता मोहुर्ले, अशोक लेनगुरे, प्रकाश मालेकर, राजहंस बुजाडे, संभा मडावी, तुळशीराम तुमराम, प्रभाकर बावणे, पंचफुला मडावी, लता मालेकर, ताराबाई तुमराम, रुखमा मोहुर्ले, तारा किनाके, शकुंतला लेनगुरे आदी उपस्थित होते.

Web Title: Tribal people started agitation in forest