कर्जफेडीच्या चिंतेतून वर्ध्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

वर्धा - विदर्भात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. करंजी भोगे येथील सुरेश ऊर्फ बालू बाबाराव भोगे (वय 47) यांच्याकडे नऊ एकर शेती आहे. त्यांच्यावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे चार लाखांचे कर्ज होते. पुरेसे उत्पन्न न झाल्याने कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे आज त्यांनी विष प्राशन केल्यानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

आर्वी येथील गणेश देवराव नागोसे (वय 55) यांच्याकडे खडकी शिवारात 5 एकर शेती आहे. त्यांनी स्टेट बॅंकेकडून एक लाखाचे कर्ज काढले. शिवाय सोने तारण ठेवून 50 हजार रुपयांचे सुवर्णकर्जही काढले होते. मात्र, शेतीच्या लागवडीचाही खर्च निघाला नाही. कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने शनिवारी (ता. 13) त्यांनी विषप्राशन केले. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी (ता. 18) त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सेवाग्राम व आर्वी पोलिस करीत आहेत.

विदर्भ

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

03.42 PM

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017