विवाहितेसह दोघांची आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नागपूर- एका विवाहितेसह दोघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. भाग्यश्री नीतेश गोंडाणे (वय 25, रा. गणेशनगर, दाभा) यांनी घरगुती वादातून बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेतले.

गंभीर जळालेल्या अवस्थेत त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

दुसऱ्या घटनेत, प्रशांत राजू कुंभलकर (वय 26, तांडा जुनी शुक्रवारी) यांनी मंगळवारी रात्री साडेसात वाजता विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारार्थ मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान आज गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: two people commit suicide

टॅग्स