विद्यापीठाचा व्यवहार होणार कॅशलेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नागपूर - केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वत्र कॅशलेस व्यवहाराचे वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला साद देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्यासाठी पाऊल उचलले. यासाठी संपूर्ण आधुनिक यंत्रणा येत्या मार्चपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती आहे.

विद्यापीठातील परीक्षा तसेच इतर कामे खासगी कंपन्यांना देण्यात येतात. याकरिता ई-निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांकडून पैशांचा व्यवहार धनादेश किंवा आरटीजीएसने केला जातो. त्यामुळे नव्या वर्षात यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका सामान्यांना बसला असून, शिक्षणक्षेत्रावर देखील पडसाद उमटले आहेत. परीक्षेसाठी करण्यात येणारे व्यवहार बरेचदा रोख स्वरूपातील असतात. मात्र, नोटांचा तुटवडा लक्षात घेता विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्‍यता आहे. यामुळे विद्यापीठाने हा निर्यण घेतला. या निर्णयामुळे नवीन सत्रात प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क तसेच इतर शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी तारांबळ वाचणार आहे.

नवीन सत्रात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. आजच्या आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना "प्लॅस्टिक मनी' नवीन नाही. यामुळे विद्यापीठाच्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होईल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. राजू हिवसे, वित्त व लेख अधिकारी