बीटी बियाणे कंपन्यांविरोधात पोलिस तक्रार 

bt-cotton
bt-cotton

अकोला - कपाशीवर बोंड अळीने केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण व्हावे, तसेच संबधीत बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करावे, यामागणीसह शेतकरी व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी कृषी अधीक्षक उपस्थित नसल्याने, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक मिलींद जंजाळ व शिवसैनिकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये संबधित सहा बीटी कंपन्यांविरोधात तक्रार नोंदविली. 

बीटी कपाशीवर कोणत्याही बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नसून, इतर कीडीसाठीसुद्धा हे वाण अधिक सहनशिल असल्याचा विश्वास बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बीटी बियाण्याची लागवड केली. परंतु, जिल्ह्यात सर्वत्र बीटी कपाशीवर गुलाबी, शेंदरी बोंड अळीने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांची संबधित बीटी बियाणे कंपन्यांनी फसवणूक केल्याने, अशा कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे व नुकसानग्रस्त क्षेत्राची तपासणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकत्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. परंतु, ते कार्यालयात उपस्थित नसल्याने, येथील दुय्यम अधिकाऱ्यांहस्ते संबधीत कंपन्यांविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, नगरसेवक मंगेश काळे, अतुल पवणीकर, राजेश मिश्रा, अश्विन नवले, प्रदिप गुरुखुद्दे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात खरीप २०१७ मध्ये पेरणी केलेल्या कापूस बीटी बियाणे वाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने, पिकांचे नुकसान झाल्याच्या तालुकास्तरावर एक हजार ९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तालुका स्तरीय बीज निरीक्षकाने त्यापैकी २९६ तक्रारीचे क्षेत्राची पाहणी केली असून, नमुना एच मध्ये सादर केलेल्या २८ प्राथमिक तपासणी अहवालानुसार जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समितीने मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. बीटी कपाशी बीजी २ वाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होणे अपेक्षित नसताना, कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. खालील बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांनी त्यांचे अधिकृत विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना विक्री केली असल्याने, त्यांनी महाराष्ट्र कापूस बि-बियाणे अधिनियम २००९ चे उलंघन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली प्रकरणी त्यांचेविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक मिलींद जंजाळ यांनी पोलिसांना दिली आहे. 


या कंपन्याविरोधात पोलिस तक्रार 
उत्पादक कंपनी 
कावेरी सिड्स प्रा.ली. सिकंदराबाद 
आदीत्य सिड्स सिकंदराबाद 
राशी सिड्स मेडक तेलंगणा 
रॅलीज इंडीया लि. मुंबई 
अजित सिड्स प्रा.ली. औरंगाबाद 
बायर क्रॉप सायन्स ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com