अल्पवयीन प्रेमी युगुल तिसऱयांदा गेले पळून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सदर युवकाचे वडील हे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात तसेच युवतीचे वडीलही शासकीय वैद्यकीय क्षेत्रात अधिकारी आहेत. या दोन कुटुंबात घरोब्याचे संबंध आहेत त्यामुळे युवक व युवतीचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. यातूनच प्रेम संबन्ध जुळले मात्र ही बाब दोन्ही कुटूंबांच्या लक्षात आल्याने दोन्ही अल्पवयीनांना समज देण्यात आली

एटापल्ली - येथील वर्ग दहावित शिकत असलेली एक पंधरा वर्षीय अल्पवयीन युवती व महाविद्यालयीन युवक (वय 17 वर्ष)हे प्रेमी युगल तीस-यांदा पळून गेले असुन युवतीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर युवकाचे वडील हे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात तसेच युवतीचे वडीलही शासकीय वैद्यकीय क्षेत्रात अधिकारी आहेत. या दोन कुटुंबात घरोब्याचे संबंध आहेत त्यामुळे युवक व युवतीचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. यातूनच प्रेम संबन्ध जुळले मात्र ही बाब दोन्ही कुटूंबांच्या लक्षात आल्याने दोन्ही अल्पवयीनांना समज देण्यात आली. मात्र आमची कुटुंबे आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवत असल्याची भावना त्यांची झाल्याने प्रथम दिवाळी पूर्वी तेलंगाणा राज्यात युवकाच्या नातेवाईकांकडे;  दुसऱ्यांदा दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे पळून गेले. दोन्ही वेळा नातेवाईकांनी समज देवून त्यांचे विवाह योग्य वय झाल्यास लग्न करुन देण्याची कबूली दिली. मात्र दोघेही अल्पवयीन पुन्हा पळून गेले. त्यामुळे युवतीच्या आईच्या तक्रारी वरुन एटापल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला आहे. प्रेमी युगुलांचा शोध घेण्यात येत आहे.