हॉस्पिटल हब, चोवीस तास वर्दळ

नागपूर - तकिया झोपडपट्टी वस्तीत गस्त घालताना बिट इन्चार्ज पोलिस अधिकारी व कर्मचारी.
नागपूर - तकिया झोपडपट्टी वस्तीत गस्त घालताना बिट इन्चार्ज पोलिस अधिकारी व कर्मचारी.

नागपूर - हॉस्पिटल हब आणि मार्केट एरिया असलेल्या धंतोलीत चोवीस तास वर्दळ असते. त्यामुळे ‘व्हिजिबल पोलिसिंग’वर धंतोली पोलिसांचा भर आहे. रात्रभर पोलिस रस्त्यावर दिसत असल्याने धंतोलीत चोरी, घरफोडी, लूटमार, हाणामारी आणि टोळीयुद्धासारखे गुन्हे घडत नाहीत. बिट सिस्टिममुळे झोपडपट्टीबहुल रहिवासीसुद्धा थेट बिट इन्चार्जला कॉल करतात. रात्रीच्या वेळी पोलिस सतर्क असतात. तकिया वस्तीतील नागरिकांच्या समस्या आणि पोलिसांबाबत मत जाणून घेतले असता त्यांनी समाधान व्यक्‍त केले. धंतोलीत पोलिस खबऱ्यांचे सर्वांत मोठे जाळे असून, पोलिसांच्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असतात. गस्ती पथकात असलेल्या महिला पोलिस अधिकारी रोडरोमियोंवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

डीबी पथक, स्क्वॉड सज्ज
धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत यशवंत स्टेडियम आणि गजानननगर हे दोन बिट आहेत. ठाण्याचे नेतृत्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्याकडे आहे. पोलिस ठाण्यात ९० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यात २ एपीआय आणि ८ पीएसआय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तकिया झोपडपट्टीसह काही परिसरात गुन्हेगारी आहे. मात्र, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डीबी पथक आणि स्पेशल स्क्‍वॉडचे प्रयत्न असतात. 

यशवंत स्टेडियम बिट
इन्चार्ज - नम्रता जाधव 
(सहायक पोलिस निरीक्षक) 
मो. ७८७५१३९६५०
एकूण कर्मचारी : १९
लोकसंख्या : एक लाख
गुन्हेगार : १५० 

बिटच्या सीमा
शनिमंदिर चौक-मुंजे चौक-झाशी राणी चौक-रहाटे कॉलनी-काँग्रेस नगर-अजनी रेल्वे स्टेशन-मनपा पूल-लोहा पूल.

महत्त्वाची ठिकाणे
नेताजी मार्केट, यशवंत स्टेडियम, छोटी धंतोली, पत्रकार भवन, तकिया, कुंभारटोली, विश्‍व हिंदू परिषद कार्यालय, अहल्यादेवी मंदिर आणि गोरक्षण.

गजानननगर बिट
इन्चार्ज - अनंत वडतकर, सहायक पोलिस निरीक्षक
मो. ८८८८५०७७१८
कर्मचारी : १४, गुन्हेगार : ४५
लोकसंख्या : ७०,०००

बिटच्या सीमा -
नरेंद्रनगर-सावरकर चौक-देवनगर चौक-अजनी चौक-रहाटे कॉलनी-काँग्रेसनगर कॉलनी-चुनाभट्टी आणि नरेंद्रनगर रेल्वे.

प्रमुख ठिकाणे
मध्यवर्ती कारागृह, साईमंदिर, धान्य गोदाम, फॉरेन्सिक लॅब, राहुलनगर, प्रशांतनगर, हिंदुस्थान कॉलनी, चंद्रमणीनगर, उर्विला कॉलनी, सहकारनगर, विवेकानंदनगर आणि सावरकरनगर.

पोलिसांसमोरील समस्या
धंतोली हद्दीत मध्यवर्ती कारागृह असल्याने नेहमी सतर्क राहावे लागते. जेलची सुरक्षा आणि वर्धा रोडवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जोखीम पोलिसांवर आहे. धंतोली परिसरात बाजार, सुमारे दीडशे रुग्णालये असल्याने या परिसरात नेहमी पार्किंगची समस्या पोलिसांसमोर आहे. अनेक रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा अडथळा ही सर्वांत मोठी समस्या आहे. वाहनचोरी, बॅगलिफ्टिंग आणि चेनस्नॅचिंगचेही प्रमाण बरेच आहे. भुरटे चोर आणि तोतयेगिरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. डॉक्‍टरांशी झालेले वाद आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड अशा स्वरूपाचे गुन्हे वर्षभर असतात. 

मुंबईतील बिट सिस्टिमचा अनुभव असल्याने अभ्यासात्मक पोलिसिंगवर भर देण्यात येत आहे. गुन्हेगारांची यादी बनवणे आणि त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी विशेष पोलिस पथक निर्माण केले. नागरिकांना भेटायचे असल्यास वपोनि कॅबिनमध्ये थेट प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे तक्रारदार ते अधिकारी थेट संवाद होतो. मोहल्ला समिती, सलोखा कार्यक्रम, विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके आणि वस्तूवाटप, गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवादरम्यान बैठका घेतल्या जातात.
- राजन माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, धंतोली पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com