विठ्ठल भक्ताचे हृदयविकाराने पंढरपुरात निधन

paraskar
paraskar

अकोला - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या मांजरी येथील भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री पंढरपुरात घडली.

बाळापूर तालुक्यातील माजरी येथील सुधाकर राजाराम पारसकर (वय ४७) हे गावातील नागरिकांसोबत रेल्वेने पंढरपूरला गेले होते. मंगळवारी दिवसा दर्शन आटोपून ते रात्री पंढरपुरातील कोकण मठात मुक्कामी होते. तेथे रात्री १ वाजताच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत खराब झाली व त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता माजरी येथे कुटुंबियांना तत्काळ देण्यात आली. बुधवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय तेथे गेल्यावर सुधाकर पारसकर यांचे शव त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पंढरपुरात पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता माजरीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व बराच आप्त परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com