सभापतींची अर्वाच्य शिवीगाळ, आर्वी पालिकेत काम बंद

राजेश सोळंकी
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नगरसेवक-कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची

आर्वी (जि. वर्धा) : नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीने नगरपालिका कर्मचारी संघटनेचे व अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष संजय अंभोरे यांना बुधवारी (ता. १३) सकाळी साडेसात वाजता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने नगरपालिकेचे नगरसेवक व कर्मचारी यांच्यात बाचाबाची होऊन एका नगरसेवकास किरकोळ मार लागला.संतप्त कर्मचार्यांनी नगरपालिका बंद करून कामबंद आंदोलन सुरु केले.या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.

बुधवारी (ता. १३) सकाळी साडेसात वाजता संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय अंभोरे येथील शिवाजी चौकात चहा पीत असतांना आरोग्य सभापती रामू राठी यांनी संजय अंभोरे यांना अस्श्लील भाषेत शिवीगाळ केली.तू आता खूप माजून गेला आहे, तुझा बंदोबस्त करावा लागेल, असे बोलू जीवे मारण्याची धमकी दिली.आमचे कर्मचार्यांचे तीन महिन्यापासून वेतन नाही या बाबत सभापती यांना विचारणा केली असता तुमची औकात नाही आमचे समोर उभे राहण्याची , तुम्हाला पाहून घेऊ अशी पुन्हा धमकी दिल्याने माझ्या परिवाराचे किंवा माझे काहीही कमीजास्त झाल्यास आरोग्य सभापती व काही नगरसेवक जबाबदार राहतील असे तक्रारीत नमूद केले असून आम्ही ता.१३ पासून आम्ही सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारत असल्याचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

शिवीगाळीची हि घटना भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार यांच्या समोर घडली.कर्मचाऱ्यांना असे बोलून शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला, काही अडचणी असल्यास मुख्याधिकारी यांना सांगावे, मुख्याधिकारी आम्हाला पत्र देयील, कारवाई करेल.आज ५० लोकांसमोर माझा अपमान करून शिवीगाळ केली.मला फारच वाईट वाटत आहे, या घटनेमुळे मी आत्महत्या सुद्धा करू शकतो.

जिल्हाध्यक्ष सफाई मजदूर संघ 
या घटनेची तक्रार संजय अंभोरे, महेंद्र शिंगाने यांनी पोलीस ठाण्यात केली तर विरोधात नगरसेवक कैलाश गळहाट नगरसेवक नरसिंग सारसर , हेमंत काळे आरोग्य सभापती रामू राठी यांनी तक्रार केली आहे.या प्रकरणासंदर्भात नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, न.प.चे सर्व सभापती, नगरसेवक यांनी दुपारी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.कर विभागात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार कर्मचार्यांनी केला असून सेवानिवृत्त कर्मचारी योगेश पवार, धर्मपाल भगत, महेंद्र कुर्झाडकर, गजभिये, माळोदे, बावनकर, वैशाली बुटले, यांना नोटीस देऊन चौकशी सुरु केल्याने जाणूनबुजून आजचे प्रकरण घडविले, या घटनेचा निषेद करून अंभोरे व शिंगाने या दोन कर्मचार्यांचे निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी असल्याचे व कर्मचार्यांच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास होत आहे.आम्ही घरी बोलावून घरचे काम करायला सांगत नाही तर लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे त्यांचे काम आम्हाला करायचे आहे.कर्मचार्यांना काही म्हटले तर आंदोलनाची धमकी देतात असे स्पष्ट केले.