बोरधारणात सेल्फीचा नादात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

आजचा दिवस सेलूसाठी काळा दिवस ठरला असून सकाळी दहा वाजता पासून तर दुपारचे बारा वाजता पर्यंत दोन अपघातात सात लोक गंभीर झाले असून जवळपास 20 किरकोळ जख्मी आहेत तर बोरधरण येथे सेल्फी काढण्याच्या नादात दोघांचा पाण्यात बुडून म्रुत्यू झाला आहे.

वर्धा : आजचा दिवस सेलूसाठी काळा दिवस ठरला असून सकाळी दहा वाजता पासून तर दुपारचे बारा वाजता पर्यंत दोन अपघातात सात लोक गंभीर झाले असून जवळपास 20 किरकोळ जख्मी आहेत तर बोरधरण येथे सेल्फी काढण्याच्या नादात दोघांचा पाण्यात बुडून म्रुत्यू झाला आहे.

भीमनगर वर्धा परिसरातील भाविक भक्त वाकी येथील बाबा ताजुद्दिन यांच्या दरगाह येथे स्वयंपाकासाठी दोन तीन मालवाहू वाहनाने निघाले होते. वर्धा- सेलु मार्गावरील रमना पाटीजवळ वर्धेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या यादव मिनी ट्रांसपोर्ट च्या मालवाहू गाडी क्र. MH32-Q 1177 चे ब्रेक मधे काही बिघाड आल्याने घाबरलेल्या चालकाचा गाडीवरुन नियंत्रण सुटले व गाडी पलटी झाली. ही घटना नजिकच्या सेलु येथे वार्या सारखी पसरताच सेलु शहर भाजपा अध्यक्ष वरुण दफ्तरी हे आपल्या मित्र मंडळी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सेलु ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णवाहिका बोलावून जख्मी महिला व लहान मुलांना पोहोचविण्यात मदत केली. त्यांचे म्हणणे नुसार जख्मींची संख्या 20 ते 25 असून त्यातील 6-7 गंभीररित्या जख्मी होते. ही घटना आज दि. 5 नोव्हेंबर रविवार च्या सकाळी ९. ३० वाजताचे सुमारास घडली.

सकाळी १०. ३० वाजण्याच्या सुमारास सेलू येथील माहेर मंगल कार्यालयाकडून रेहकी कडे पॅशन दुचाकी वाहन क्रमांक MH49-X091ने जात असता रेहकी वळणावर येळाकेळी येथून शिवनगांव येथे गिट्टी घेऊन जाणाऱ्या यादव कंस्ट्रक्शन, गोटेवाडी, वर्धा या कंपनी चा टिप्पर क्र. MH32-Q7655 च्या डिझल टँकला जबर  धडकेने नागपुर येथील रहिवासी नितीन चलाख वय 32 वर्ष हा गंभीर जख्मी झाला असून त्याचेवर सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. धडक ईतकी जबर होती की दुचाकी वाहनाचा सामोर चा भाग पुर्णतः मोडतोड झाला आहे. तसेच चालक नितीन हा हेलमेट घालून असल्याने या घटनेतून बचावला असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

तालुक्यातील बोरधरण येथील निसर्गरम्य वातावरणाचे आनंद लुटण्यासाठी काही युवा मंडळी मित्रांसह येथे आले होते. सध्या धरण भरल्यामुळे तेथील विहंगम दृश्य पाहता सेल्फी काढण्याचा नाद ते आवरु शकले यात एकाचा पाय घसरला त्यात तो पडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा ही तोल सुटला. अशा प्रकारे नागपुर येथील रहिवासी पंकज गायकवाड व निखिल काळबांडे याना सेल्फी मुळे जीव गमवावा लागला. या घटनेची फिर्याद सोबत असलेल्या हिमांशु याने सेलु पोलिसांना दिली असुन नुकतेच दोन्ही युवकांचे शव काढण्यात आले आहे. पुढील तपास सेलु पोलिस करीत आहे.