काँग्रेस आमदाराला नोटबंदीच्या काळा दिवसाचा विसर

भुपेश बारंगे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नोटबंदीचा देशात अनेक नागरिकांना सामना करावा लागला त्यामुळे अनेकांचे जीव ही गेले काहींना वेळेवर पैसे मिळाले नाही यासह अनेक समस्या उद्भवल्या त्यामुळे नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होताच काँग्रेस पक्षाकडून काळा दिवस पाळला गेला.

वर्धा : नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात 8 नोव्हेंबरला (बुधवार) काँग्रेस पक्षाने काळा दिवस पाळत निवेदन दिले. मात्र वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदार संघात मात्र काँग्रेसचे आमदार असताना मात्र त्यांनी ना निवेदन दिले ना मोर्चा काढला यावरून त्यांना त्यांची भुरळ पडली तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

आर्वी मतदार संघामध्ये आर्वी ,कारंजा घा ,आष्टी या तीन तालुक्याच्या समावेश आहे. यामध्ये दोन नगरपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. याचं मतदार संघात काँग्रेसचे आमदार अमर काळे हे आहेत. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे काही ठिकाणी जि.प. सदस्य व पं.स. सदस्य आहे. मात्र यांना कोणालाच पक्षाची काही देणंघेणं नसल्याचे दिसून आले कोणीही कुठेही मोर्चा तर काढला नाहीच पण निवेदन ही दिले नाही. जिल्ह्यात दोन मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहे. त्यापैकी देवळी मतदार संघाचे आमदार रणजित कांबळे यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांसह निवेदन दिले. त्यामुळे या वर्धा जिल्ह्यातही गटबाजी दिसून आली. मात्र काँग्रेस पक्षाचे आमदार अमर काळे यांनी नोटबंदीचा काळा दिवस पाळला नाही यावरून असे दिसत आहे, की भाजप ने केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचा आर्वी मतदार संघात काँग्रेसला हा फायदेशीर ठरला तर नाही ना.

आर्वी मतदारसंघात नोटबंदीचा काळा दिवस का पाळला गेला नाही हा प्रश्न आहे. नोटबंदीचा काळा दिवस पाळला नसल्याने अनेक तर्कवितर्क नागरिक काढत आहेत. नुकताच कौडण्यापूर येथे भाजपचे सुधीर दिवे यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्या ठिकाणी आमदार अमर काळे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली त्यामुळे आमदार अमर काळे सध्या भाजप पक्षासोबत असल्याचे दिसून येत असताना काल झालेल्या नोटबंदीच्या काळा दिवस पाळला नसल्याने नागरिक संभ्रमात आहे. कारंजा घा तालुक्यात दोन पंचायत समिती सदस्य आहे व कारंजा, आष्टी येथे नगर पंचायतीमध्ये सत्ता आहे. यांनीही कुठे निवेदन दिले नाही मग हे सर्व काँग्रेस पक्ष विरोधी तर नाही ना.

सध्या जिल्ह्याजिल्ह्यात काँग्रेस पक्ष आक्रोश मोर्चा काढत आहे राज्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे आपल्या साथीदारांना सोबत घेऊन सहभाग नोंदवत आहे. मात्र त्यात आमदार अमर काळे यांचाही सहभाग आहे. मात्र नोटबंदीचा काळा दिवस यांनी पाळला नसल्याने जिल्ह्यात अजूनही काँग्रेस पक्षात चंद्रपूर येथे नुकताच दोन ठिकाणी एकाच दिवसी सभा घेण्यात आल्या. यामुळे पक्षात दोन गट असल्याचे दिसून आले पक्षाची मरगड अजूनही निघाली नसून या वर्धा जिल्ह्यात ही दोन गट आहे यावरून दिसत आहे. एका गटाने काळा दिवस पाळला तर अमर काळे यांनी काळा दिवस पाळला नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्याना याबाबत काही सूचनाही दिल्या गेल्या की नाही यावरून हे आमदार काँग्रेस पक्षाच्या विरोधात तर नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे या मतदार संघातुन काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार काहीच होत नाही असेच दिसत आहे.

नोटबंदीचा देशात अनेक नागरिकांना सामना करावा लागला त्यामुळे अनेकांचे जीव ही गेले काहींना वेळेवर पैसे मिळाले नाही यासह अनेक समस्या उद्भवल्या त्यामुळे नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होताच काँग्रेस पक्षाकडून काळा दिवस पाळला गेला.