वर्धा: नरभक्षक वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

भुपेश बारंगे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

वर्धा जिल्ह्याच्या सिंधी तालुक्यातील बोर अभयारण्यालगत वाघिणीचा मृतदेह सापडला. विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याची माहिती कळताच वन विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. घटनास्थळी वन विभागाने नरभक्षक घोषित केलेल्या आणि ठार मारण्याचे आदेश दिलेल्या वाघिणाची मृतदेह आढळून आला.

वर्धा - नरभक्षक म्हणून वनविभागाने ठार मारण्याचे आदेश दिलेल्या आणि गेल्या आठ दिवसांपासून न्यायालयाच्या प्रक्रियेत अडकलेल्या वाघिणीचा आज (शनिवार) सकाळी विजेच्या तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

 ब्रम्हपुर येथील जंगल परिसरात या नरभक्षक वाघीणीने धुमाकूळ घालुन दोघांना ठार केले. त्यानंतर या वाघीणला वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यत आणण्यात आले. मात्र ती वाघीण घनदाट जंगल सोडून बाहेर निघाली. त्यानंतर तिने खरंगणा ,कारंजा, तळेगाव ,आष्टी, वरुड ,काटोल या वनविभाग परिसरातून 500 किलोमीटर अंतर फिरून यात दोघांना ठार केले. तर दोघांना जखमी केले. त्यानंतर ती वाघीण पुन्हा कारंजा वनविभाग परिसरात शिरली. दोन दिवसांपूर्वी ती वाघीण कोंढाळी नजीक धोटीवाडा परिसरात होती. तर ती तिथे न थांबता समोर चालत राहिली. त्यानंतर शुक्रवारीही वाघीण कारंजा वनपरिक्षेत्रात आली. अन मेठ हिरजी व उमरविहिरी परिसरात असल्याची माहिती वनविभागाने दिली. तर तिला ठार करण्यासाठी वनविभागाला मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने तिला ठार करण्यासाठी तिच्या मागावा घेत होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री वाघीण 10 किलोमीटर अंतर फिरून आंभोरा शिवारात शिरली आणि ज्या शेतात ही वाघीण असल्याचे माहिती झाली. तशीच पहाटे चार वाजता वनविभागाने रामकृष्ण टेकाम याना भ्रमणध्वनी केला आणि त्याला सांगण्यात आले की तुझा शेतात वाघीण आहे. मात्र ती सध्या लोकेशननुसार कुठे फिरत आहे असे सांगितले. त्यानंतर शेतकरी हा वनविभाग सांगितले असल्याने त्यांनी आपल्या पुतांना व भासा याला घेऊन शेताकडे आला शेतात वाघीण झोपली असल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाघीण शेतात असल्याची माहिती शेतकऱ्याला मिळाली तेव्हांच वनविभागाला शेतकऱ्यांनी सांगितले की माझ्या शेतात पिकाच्या बाजूने विद्युत प्रवाह लावण्यात आला आहे त्यामुळे तो विद्युत प्रवाह डीपीवर जाऊन बंद करून घ्या असे पहाटेला चार वाजतात सांगण्यात आले. शेतात जाण्याची गरज नाही खासगी माणसाकडून विद्युत पुरवठा खंडित करता येतो असेही सांगितले. मात्र वनविभाग त्याची शेतकऱ्याची कोणतीही माहिती वनविभागाने कानावर घेतली नाही. त्यानंतर पहाटे सहाच्या दरम्यान वाघीणीचे लोकेशन दाखवणे बंद झाले असल्याने तिचा विजेच्या झटक्याने मृत्यू  झाला असे वनविभागाला संशय आला. त्यानंतर शेतातला विद्यतु प्रवाह डीपी वरून बंद केला शेतात कुठे विद्युत करंट लावला याची शेतकऱ्याला विचारणा केली. त्यानंतर त्या भागाची पाहणी सुरू केली काही अंतरावर जाताच ज्वारी पिकाच्या बाजूला लागलेल्या विद्यतु प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या दिसले असतंच शेतकऱ्यांना शेता बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर ती वाघीण झाकून रस्त्यावर आणून वनविभागाच्या गाडीत टाकले त्यानंतर चौकशी करण्यासाठी रामकृष्ण टेकाम याना वनविभागाने ताब्यात घेतले. दुपारपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसून घटनास्थळी तपासणी करून पंचनामा वनविभागाने केला असल्याचे सांगितले.

ही घटना यशोदा भगवान टेकाम यांच्या शेतामध्ये घडली. यांच्याकडे चार एकर शेती आहे. हि शेती मुलगा रामकृष्ण टेकाम करत असतात. त्यामध्ये पीक ज्वारी सोयाबीन, भाजीपाला असे पीक आहे. मात्र जंगल लागून शेती असल्याने वन्यप्राणी शेतातील पिकाची नासाडी करत असल्याने रात्रीला शेताचे संरक्षण व्हावे यासाठी शेतामधील पिकाच्या बाजूने विजेचा झटका लावून शेतापिक वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आजजी घटना घडली ही घटना शेतकऱ्याला करायची नव्हती मात्र ही घटना वनविभाग च्या हलगर्जी ने झाली असा आरोप कुटुंबांनी केला आहे आम्ही त्यांना सांगितले की आमच्या शेतात विद्यतु  प्रवाह आहे तो बंद करा मात्र तो विद्युत प्रवाह बंद केला नाही त्यामुळे या वाघीणचा मृत्यू झाला कारंजा महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता खडसे यांना याबाबत विचारले असता ज्या शेतात ही घटना घडली, त्या शेतकऱ्याने ही बेकायदेशीर कृत्य केले असून याची कल्पना शेतकऱ्याने वनविभागाला दिली असेल तर वनविभागाने आम्हाला द्यायला पाहिजे होती .आम्ही त्यांच्यावर कारवाई केली असती किंवा तो विद्युत पुरवठा खंडित केला असता मात्र वनविभाग आम्हाला माहिती दिली नाही त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही असे सांगून या प्रकरणावरून हात झटकले.

Web Title: Wardha news tiger died in wardha