ऍट्रॉसिटीचा गैरवापर आम्ही करीत नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

विधान परिषदेत नाही, लोकसभा किंवा राज्यसभेचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. आम्ही सोडल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवरून खाली आले. हे सांगतानाच राज्यातील भाजप-सेनेच्या सरकारची दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्य सरकारच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदूमिल, दीक्षाभूमीला "अ' दर्जा, लंडन येथील बाबासाहेबांचे घर खरेदी करण्यात दाखवलेली तत्परता लक्षवेधक आहे. याचा अर्थ त्यांच्यासोबत आम्ही आहोत, असा काढू नये. 
- डॉ. राजेंद्र गवई, सरचिटणीस, रिपाइं.

नागपूर : ऍट्रॉसिटी असो की आरक्षण, दोन्ही विषयांच्या अनुषंगाने मराठा समाजाकडून मोर्चे निघत आहेत. मोर्चे आणि प्रतिमोर्चे काढून सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती आहे. अशावेळी सामोपचाराने घेण्याची गरज आहे. ऍट्रॉसिटी हा कायदा दलितांच्या संरक्षणासाठी आहे. यामुळे कायदा राबविताना गुन्हेगारांसाठी अधिक कडक करण्याची गरज असून, दलितांवर गैरवापर केल्याचा आरोप करू नका. अमरावती येथील लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात याप्रकारची तक्रार दाखल केली होती. आम्ही फक्त संरक्षणासाठी याचा वापर करतो, असे परखड मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले. 

आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान 12 डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर लाखोंचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देताना डॉ. गवई पत्रकारांशी बोलत होते. दलितांकडून ऍट्रॉसिटीचा गैरवापर होत नसून इतर समाजांकडूनच ऍट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. जोवर प्रश्न सुटत नाहीत, तोवर दलितांचे मोर्चे निघत राहणार आहेत. उलटपक्षी, मराठ्यांसह धनगर व मुस्लिमांना आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे. संसदेत संशोधन करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी. 

दिवंगत दादासाहेब गवईंनंतर गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 52 वर्षांतील निवडणूक काळात कुणीही ऍट्रॉसिटीची तक्रार केली नाही. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीत राष्ट्रवादी व शिवसेनेने एकमेकांविरुद्ध ऍट्रॉसिटीची तक्रार केली. यावरून ऍट्रॉसिटीचा कोण गैरवापर करतो, हे समजून घेण्याची गरज असल्याचे डॉ. गवई यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे, एन. आर. सुटे, गोकुळ पांडे, वसंत हुमने, प्रा. बोधीराज मून, नीळू भगत, पापा मूल उपस्थित होते. 

 

विधान परिषदेत नाही, लोकसभा किंवा राज्यसभेचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. आम्ही सोडल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवरून खाली आले. हे सांगतानाच राज्यातील भाजप-सेनेच्या सरकारची दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्य सरकारच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदूमिल, दीक्षाभूमीला "अ' दर्जा, लंडन येथील बाबासाहेबांचे घर खरेदी करण्यात दाखवलेली तत्परता लक्षवेधक आहे. याचा अर्थ त्यांच्यासोबत आम्ही आहोत, असा काढू नये. 
- डॉ. राजेंद्र गवई, सरचिटणीस, रिपाइं.

विदर्भ

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त  नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017