संघाची नोंदणी का नाही?

डॉ. मोहन भागवत
डॉ. मोहन भागवत

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का केली जात नाही, असा सवाल अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात आहे. याच नावाने संघटना स्थापन करण्याचा प्रयत्नही नागपूरमध्ये झाला. यामुळे मोठा वादही उपस्थित झाला असून याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज दिल्ली येथे आपल्या व्याख्यानातून या प्रश्‍नाचे उत्तर दिले. 

दिल्ली येथील ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपात या प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर डॉ. भागवत यांनी दिले. ते म्हणाले की, संघाची स्थापना १९२५ साली नागपुरात झाली. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. त्यावेळी देशाचे कायदे नव्हते. म्हणून संघाने नोंदणी केली नाही. स्वातंत्र्यानंतर संघकार्याचा आणखी विस्तार होत गेला. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक संघटनेने नोंदणी केलीच पाहिजे असा कुठलाही कायदा करण्यात आला नाही. अद्याप असा कुठलाच कायदा अस्तित्वात नाही. असे असले तरी कायदेशीररीत्या संघाचा एक दर्जा आहे. त्यामुळे आम्हाला करही लागत नाही.

असे असले तरी आम्ही ही बाब गंभीरतेने घेत असून, संघाच्या खर्चाचे लेखापरीक्षण (ऑडिट) करतो. जेव्हा सरकार आम्हाला हिशेब मागेल तेव्हा निश्‍चितच सादर करू. आमचे आर्थिक व्यवहार बॅंक खात्याच्या माध्यमातून चालतात. पैशाचे बेहिशेबी व्यवहार आम्ही कधीच करत नाही. संघाच्या नोंदणीवरून नागपुरात सुरू असलेल्या चर्चांवर पहिल्यांदाच एवढी सविस्तर भूमिका पुढे आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com