महिला आयोगाने पोलिसांचे कान टोचले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नागपूर - सुरक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या आमदार निवासातच तब्बल चार दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याच्या प्रकरणाने समाजमन ढवळून निघाले आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे यांनी आज पीडित मुलीची भेट घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणातील निष्काळजीपणासाठी ठाकरे यांनी या वेळी तपास अधिकाऱ्यांचे कान टोचले. पीडित मुलीच्या वडिलांनी अधिकाऱ्यांसमक्ष पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. 

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आमदार निवासातील कर्मचारी पैशासाठी खोली कोणालाही उपलब्ध करून देत असल्याची बाब या घटनेच्या निमित्ताने स्पष्ट झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हा बाल कल्याण विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्यासह पीडित मुलीची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. तातडीने सर्व त्रुटी दूर करून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ठाकरे यांनी या वेळी दिले.