युथ समिटची संपूर्ण राज्याला गरज - महापौर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नागपूर - आत्मविश्‍वासाचा अभाव, चुकीच्या समजुती आणि भीतीमुळे विदर्भातील मुले इंटरव्ह्यूला घाबरतात. मात्र, फॉर्च्यून फाउंडेशनच्या युथ समिटमुळे गैरसमज दूर झाल्याने अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत. यामुळे अशा मार्गदर्शन रोजगार मेळाव्याची संपूर्ण महाराष्ट्राला गरज असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. 

नागपूर महानगरपालिका, फॉर्च्यून फाउंडेशन व ईसीपीएतर्फे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित तीनदिवसीय युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपाप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर शहराध्यक्ष, आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार प्रा. अनिल सोले, ईसीपीएचे सचिव प्रा. कुणाल पडोळे, फॉर्च्यून फाउंडेशनचे सचिव कपिल चांद्रायण आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याचे संयोजक अनिल सोले यांनी पुढील वर्षी पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असणार, असे सांगितले. महाराष्ट्र स्तरावर अशा मेळाव्यांची खूप आवश्‍यकता आहे. विदर्भातील मुलांना समुपदेशनाची गरज आहे. मेळाव्यात विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला असून विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांनी निवड झाली.  

मानव संसाधनांची बैठक
पुढील प्रक्रियेसाठी ते पात्र ठरले आहेत. स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया यासारख्या योजनांची मोठ्या प्रमाणात मेळाव्यात विद्यार्थ्यांना जिज्ञासा होती. पुढील दोन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रात विविध कपंन्यांच्या मानव संसाधनांची बैठक बोलविण्यात येईल. या माध्यमातून वैदर्भीय मुलांना कमीत-कमी सहा महिन्यांचे समुपदेशन प्रदान करण्यात येईल, असेही आमदार सोले यांनी सांगितले.

Web Title: Youth Summit in need throughout the state