विंचूरमध्ये शंभर कोटींचा अन्नप्रक्रिया उद्योग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक ः विंचूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर कोटींचा ÷अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी सुरु आहे. प्रकल्पामध्ये मका आणि इतर शेतमालावर करण्यात येणारी प्रक्रियेची पाहणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली. 

नाशिक ः विंचूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर कोटींचा ÷अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी सुरु आहे. प्रकल्पामध्ये मका आणि इतर शेतमालावर करण्यात येणारी प्रक्रियेची पाहणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली. 
श्री शिवसाई एक्‍स्पोर्ट अँड पॉलिशेट्टी सोमासुंदरम ऍग्रो एक्‍स्पोर्ट कंपनीचे संचालक सांबाशिव राव, नरेश चौधरी, मुख्य समन्वयक शिवदास आव्हाड, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर रेड्डी यांनी प्रकल्पाबद्दल माहिती दिली. प्रकल्पात पांढरा कांदा, मका, वटाणा, गाजर, लसूण, फ्लॉवर अशा शेतमालावर प्रक्रिया करुन "बाय प्रॉडक्‍ट' तयार करण्यात येणार आहेत. दरवर्षी 10 हजार टन शेतमालावर प्रक्रिया करुन निर्यात केली जाणार आहे. लासलगाव व येवला हे कांद्याचे आगार असून राज्यातील उत्पादनात इथल्या उत्पादनाचा साठ टक्के हिस्सा आहे. मात्र कांद्याच्या साठवणुकीचा प्रश्‍न असल्याने आवक एकदम होऊन भाव गडतात. ही समस्या दूर व्हावी म्हणून शेतमालाचे 10 हजार टन क्षमतेचे गुदाम उभारण्यात आले आहे. तसेच टिकाऊ नसलेल्या कांद्यावर प्रकिया केली जाणार आहे. 
कांदा निर्जलीकरणाचा प्रकल्प 
इथे कांदा निर्जलीकरणाचा प्रकल्प साकारत आहे. करार शेतीद्वारे शेतकऱ्यांना संलग्न केले जाणार आहे. आतापर्यंत दहा शेतकऱ्यांसमवेत करार करण्यता आला आहे. याशिवाय कमी खर्चात शेतकऱ्याच्या मालाचे अधिक उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना माफक दरात उच्च प्रतीचे बियाणे देण्यापासून त्यांचा माल विकत घेण्यापर्यंत मार्गदर्शन व सहाय्य केले जाणार असल्याचे यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ, वसंत पवार, साहेबराव मढवई, दिलीप खैरे, महेंद्र काले, विश्वासराव आहेर, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, हरिश्‍चंद्र भवर, भाऊसाहेब बोचरे, हरिभाऊ जगताप, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दुष्यंत उईके, उपअभियंता नितीन पाटील, एस. एस. पाटील हे उपस्थित होते. 

अन्नप्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळणार आहे. शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे पैसे मिळत असताना स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. प्रकल्पातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्‍य होईल.
- छगन भुजबळ (माजी उपमुख्यमंत्री) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Agro Process