पुणे जिल्ह्यातील धरणांत अवघा ९२ टीएमसी पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे - कमी पाऊस आणि रब्बी हंगामात वाढलेल्या पाण्याच्या वापरामुळे धरणांतील पाण्याचाही वापर वाढू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ९२. २९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा वापर अधिक वाढल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.    

पुणे - कमी पाऊस आणि रब्बी हंगामात वाढलेल्या पाण्याच्या वापरामुळे धरणांतील पाण्याचाही वापर वाढू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ९२. २९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा वापर अधिक वाढल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.    

पावसाळ्यातील चार महिन्यांत अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस झाला. पावसाचा खंडदेखील पडला. या काळात धरणांनीही तळ गाठल्याचे चित्र होते. त्यामुळे राज्यातील धरणे भरतील की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून होती. परंतु आॅगस्ट, सप्टेबरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील बहुतांशी धरणे शंभर टक्के भरली. याच कालावधीत जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात कमी पावसामुळे पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. 

सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनीही पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे डिंभे धरणातून डाव्या कालव्याला ६५० क्सुसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. खडकवासला धरणातून उजव्या कालव्याला ५० क्युसेक, वीर धरणातून उजव्या कालव्याला ६५०, तर डाव्या कालव्याला ११०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. बंद जलवाहिनीद्वारेही पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन्ही प्रमुख शहरांना पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या ९२ टीएमसी पाणीसाठा असला, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.

धरणनिहाय उपयुक्त असलेला पाणीसाठा (टीएमसीमध्ये) - 
पिंपळगाव जोगे १.३३, माणिकडोह १.४७, येडगाव ०.४६, वडज ०.५१, डिंभे ६.३२, घोड १.८९, विसापूर ०.०९, कळमोडी ०.९२, चासकमान ३.३७, भामाआसखेड ५.४०, वडीवळे ०.७९, आंध्रा २.५१, पवना ५.७५, कासारसाई ०.३८, मुळशी १२.३४, टेमघर ०.१२, वरसगाव ९.१७, पानशेत ७.२४, खडकवासला १.२०, गुंजवणी २.०३, निरा देवधर ७.१३, भाटघर १४.६८, वीर ७.१९.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 92 TMC Water Storage in Pune District Dam