शेतीमाल निर्यातीला रेल्वेचा आधार

दीपक चव्हाण
सोमवार, 13 जुलै 2020

भारत- बांगलादेश रेल्वे विभागाने चांगली कामगिरी नोंदवली. जून महिन्यात १०३ मालवाहू रेल्वेद्वारे आवश्यक वस्तूंची ने आण करण्यात आली.खास करून कांदा, साखर, मिरची आदी शेतीमालाच्या व्यापाराला चालना मिळाली.

लॉकडाऊनमुळे दक्षिण आशियातील  व्यापार सेवा खंडीत झाली असताना भारत- बांगलादेश रेल्वे विभागाने चांगली कामगिरी नोंदवली. जून महिन्यात १०३ मालवाहू रेल्वेद्वारे आवश्यक वस्तूंची ने आण करण्यात आली. खास करून कांदा, मका, हळद, साखर, मिरची आदी शेतीमालाच्या व्यापाराला चालना मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या पार्श्वभूमीवर, व्यापाराला आणखी चालना देण्यासाठी २३८ टन क्षमतेच्या पार्सल ट्रेन सेवेला बांगलादेशने परवानगी दिली आहे. त्यामुळे कमी प्रमाण असणाऱ्या शेतीमालाची ने-आण उभय देशातील व्यापाऱ्यांना करता येईल. उभय देशात व्यापारवृद्धीसाठी बेनापोल-पेत्रपोल रेल्वे लिंकद्वारे कंटेनर ट्रेन सर्व्हिस सुरू करण्यास बांगलादेशने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राच्या शेतीमालाच्या बाजारभावाला आधार मिळण्यासाठी बांगलादेशबरोबर व्यापार सुरळीत राहणे खूप गरजेचे असते. नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यातील फलोत्पादनासाठी बांगला देश क्रमांक एकची बाजारपेठ आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

(माहिती स्त्रोत : ढाका ट्रिब्यून)
(लेखक शेतीमाल  बाजार अभ्यासक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agricultural product exports by railway