esakal | गाव समृद्धीसह प्रत्येक कुटुंबांच्या विकासासाठी प्रयत्नशील 
sakal

बोलून बातमी शोधा

गाव समृद्धीसह प्रत्येक कुटुंबांच्या विकासासाठी प्रयत्नशील 

तीन वर्षांपूर्वी गावशिवारातील ओढ्यावर जलसंधारणाची कामे झाली. जिल्हा परिषद आणि अन्य निधीतून दहा बंधाऱ्यांची साखळी तयार झाली आहे. त्याच साठलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. ओढ्याचे खोलीकरण केले.

गाव समृद्धीसह प्रत्येक कुटुंबांच्या विकासासाठी प्रयत्नशील 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हिंगणगाव हमीदपूरला जोडणारे उंबरनाला आणि जामगाव नाला हे दोन ओढे गाव शिवारातून वाहतात. हमीदपूर शिवारात झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा हिंगणगावला फायदा झाला. लोकांना याचे महत्त्व कळले. त्यामुळे हिंगणगावच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून शिवारात सिंचनाची कामे करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी गावशिवारातील ओढ्यावर जलसंधारणाची कामे झाली. जिल्हा परिषद आणि अन्य निधीतून दहा बंधाऱ्यांची साखळी तयार झाली आहे. त्याच साठलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. ओढ्याचे खोलीकरण केले.

केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार शेती

दोन वर्षांपूर्वी हिंगणगावची जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड झाली. त्यानंतर गाव शिवारात खोलीकरण, बंधाऱ्यांची दुरुस्ती, नवीन बंधाऱ्यांची कामे झाली. पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी टॅंकरची वाट पाहावी लागणाऱ्या हिंगणगावात आता भूगर्भातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गावाने सुमारे एक कोटींची सिंचनाची कामे केली. त्यातील पंचवीस लाखांचा लोकसहभाग आहे. उपसरंपच दिलीप झावरे आणि बाळासाहेब पानसरे, आशाबाई ढगे, नीलम दुबे, मोहिनी सोनवणे, वैभव ताकपेरे, उद्धव सोनवणे, शोभा सोनवणे, पायल पाडळे या सदस्यांसह ग्रामसेविका सुजाता खर्से यांचा विविध उपक्रमात सहभाग असतो. 

शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

गावातील उपक्रम 
नाला खोलीकरणातून निघालेला चांगल्या दर्जाचा गाळ लोकांनी स्वखर्चाने शेतात टाकला. शिवारातील शिव व पाणंद रस्ते तयार केले. लोकसहभागातून सुमारे तेरा शिवरस्ते.
पाण्यामुळे पशुपालन व्यवसायाला बळकटी. सध्या तीन हजार लिटर दुधाचे संकलन. 
शाळा व परिसराचे सुशोभीकरण. 
सरकारी निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषद शाळा, दलित वस्ती सुधार योजनेतून अंतर्गत भूमिगत गटार योजना, संपूर्ण गावात सिमेंट रस्ते, रस्ता दुतर्फा तसेच स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण. 
गावकऱ्यांतर्फे गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळलेल्यांचा गौरव.
महिला, मुलींसाठी आरोग्य शिबिर.
गाव चार वर्षांपूर्वी हागणदारीमुक्त.
सर्व कुटुंबांना वॉटरमीटरने पाणी, त्यानुसार पाणीपट्टीची आकारणी.  


(शब्दांकन - सूर्यकांत नेटके)

महाराष्ट्र