यंदा ३६ हजार टन आंबा निर्यातीचा अंदाज

Mango
Mango

पुणे - फळांचा राजा असलेल्या हापूस आणि केशर आंब्याच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांना परकीय चलनाद्वारे अधिकचा नफा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने वाशी, जालना आणि लातूर येथील निर्यात सुविधा केंद्रामधून १ हजार, तर खासगी निर्यातदारांकडून सुमारे ३६ हजार मेट्रिक टन आंबा निर्यातीचा अंदाज आहे. 

आॅस्ट्रेलिया आणि अमेरिकेचे निरीक्षक उपलब्ध हाेताच १३ एप्रिलपासून प्रत्यक्ष निर्यातीसाठी प्रारंभ हाेणार अाहे. तर दक्षिण काेरियामध्ये आंबा निर्यातीस अधिक प्राेत्साहन देण्यात येणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. गेल्यावर्षीच्या हंगामात (२०१७-१८) पणन मंडळ आणि खासगी निर्यातदारांद्वारे ४६ हजार, ५६२ मेट्रीक टन आंबा निर्यातीमधून ३४६ काेटी रुपयांचे परकीय चलन शेतकऱ्यांना उपलब्ध झाले हाेते. आंबा निर्यातीसाठी वाशी (नवी मुंबई) येथे हापूस आंब्यासाठी तर जालना आणि लातूर येथे केशर आंब्यासाठी निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये विविध देशांच्या गरजेनुसार आंब्यावर प्रक्रिया केली जाते यामध्ये वाशी येथे हॉट वॉटर आणि विकिरण तर जालना येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. या तीनही केंद्रांवर यंत्रणा सज्ज करण्यात आल्या असून, विविध देशांचे निरीक्षक उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष निर्यातीला प्रारंभ हाेणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

वाशी येथील विकिरण सुविधेस अणुऊर्जा नियामक मंडळ आणि अमेरिकेच्या युएसडीए संस्थेच्या वतीने प्रमाणीकरण करण्यात आल्याने आंब्यावर दर्जेदार प्रक्रिया केली जाते. यामुळे अमेरिकासारख्या देशांमध्ये आंबा नाकारला जात नसल्याने निर्यातीमध्ये शाश्‍वतपणा आला आहे. यामुळे निर्यातदार आणि शेतकरी यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. तर पणन मंडळाच्या आंबा निर्यातसुविधा संगणकप्रणालीद्वारे देशभरातील विविध पॅक हाऊसेसशी जाेडल्या असून, त्याद्वारे थेट मॅगाेनेटमध्ये नाेंदणीकृत शेतकऱ्यांसमवेत लिंकींग झालेे असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले. 

परराज्यातही आंबा महाेत्सवाचे आयाेजन 
इंदाैर आणि जयपूर येथेदेखील आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येणार असल्याचे पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी या वेळी सांगितले.

गेल्या सहा वर्षांत झालेली निर्यात व विक्री मूल्य (रुपये काेटींमध्ये) 
वर्ष      निर्यात मे. टन      रुपये (काेटींमध्ये) 

२०१२-१३      ५५,५८५    २६४ 
२०१३-१४      ४१,२८०    २८५ 
२०१४-१५      ४२,९९८    ३०२ 
२०१५-१६      ३६, ७७९    ३२०
२०१६-१७      ५२,७६१    ४४३
२०१७-१८      ४६,५६२     ३४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com