अमरावतीत बोंड अळीचा ८९ टक्‍के कपाशीला फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

अमरावती - गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.८४ टक्‍के क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर असल्याने त्यापोटी ‘एनडीआरएफ’कडून १८२ कोटी २६ लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सरकारला सादर केला आहे.

अमरावती - गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.८४ टक्‍के क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर असल्याने त्यापोटी ‘एनडीआरएफ’कडून १८२ कोटी २६ लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सरकारला सादर केला आहे.

या वर्षीच्या हंगामात दोन लाख २२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ५८६ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली. मात्र ऑक्‍टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने ८९.८४ टक्‍के म्हणजेच १ लाख ९९ हजार १७२ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती कपाशीचे १ लाख ३० हजार हेक्‍टर, तर बागायती कपाशीचे ६८ हजार ३४३ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी ६८०० रुपयांप्रमाणे ८९ कोटी ६१ लाख ११ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९२ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुसार सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश सात डिसेंबरला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले होते. त्यानुसार सर्व्हेक्षण पूर्ण करून संयुक्‍त स्वाक्षरी अहवाल प्रशासनाला सादर  करण्यात आला. 

तालुकानिहाय नुकसानभरपाई (कोटींत)
भातकुली - ५.५०, अमरावती - ७.५५, चांदूर रेल्वे - ६.१८, नांदगाव खंडेश्‍वर - ७.८६, मोर्शी - १९.२२, वरुड - २७.९४, चांदूर बाजार - १५.३४, तिवसा - १२.६३, अचलपूर - १८.७१, अंजनगावसूर्जी - १४.९१, दर्यापूर - १६.९७, धारणी - ६.७७, चिखलदरा - १ कोटी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news 89 percentage loss by bond worm