साखरेच्या दरामध्ये सुधारणांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक आर्थिक चिंतेने ग्रस्त झाले होते. अधिक उत्पादनामुळे सप्टेंबर २०१७ दर १४ टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र उत्तर आणि पश्चिम भारतातील दर आता हळूहळू सुधारत असून, साखर विक्रीतही वाढ दिसून येत आहे. ही माहिती भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) केंद्रीय सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीचा आधार घेत बुधवारी (ता. ३) दिली. 

 इस्माने दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये देशात २९.१७ दशलक्ष टन साखरेची उपलब्धता राहणार आहे. आगामी काळात मागणी २ टक्क्यांनी वाढणार असून, २५ दशलक्ष टन साखरेचा वापर होणार आहे. यामुळे  ३० सप्टेंबर २०१८ अखेर ४.१७ दशलक्ष टन साखरेचा साठा राहण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत मागणी पुरवठ्याचे गणित लक्षात घेता यातून प्रारंभीचे दोन महिने पुरेशी साखर उपलब्ध राहणार आहे. ३१ डिसेंबरअखेर देशात १०.३२ दशलक्ष टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वर्षी या कालावधीत ८.१९ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होते.

सप्टेंबर २०१७ अखेर सरकारने तीन लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. डिसेंबर २०१७ अखेर यापैकी २ लाख ३५ हजार साखरेची आयात झाली आहे. यातून कारखान्यांनी दोन लाख टन साखर उत्पादित केली आहे.

Web Title: agro news Expectations for improvement in sugar rates