यांत्रिक शेतीतील शेतकरी कंपनी

विनोद इंगोले
मंगळवार, 30 जानेवारी 2018

भंडारा जिल्ह्यात आसगाव येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनी स्थापली. विचार बदलले, पारंपरिक भातशेतीचे रूपांतर यांत्रिकीकरणात केले. बियाणे कंपन्यांसाठी मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. याच परिवर्तनातून कंपनीचे सदस्य आपला उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भंडारा हा भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा. येथील शेतकरी पारंपरिक शेतीत अडकून न पडता विकासाच्या नव्या वाटा चोखाळू लागले आहेत. पवनी तालुक्यातील आसेगाव येथील शेतकरी याच ध्येयाने एकत्र आले. त्यांनी चौरास शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. 

भंडारा जिल्ह्यात आसगाव येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनी स्थापली. विचार बदलले, पारंपरिक भातशेतीचे रूपांतर यांत्रिकीकरणात केले. बियाणे कंपन्यांसाठी मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. याच परिवर्तनातून कंपनीचे सदस्य आपला उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भंडारा हा भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा. येथील शेतकरी पारंपरिक शेतीत अडकून न पडता विकासाच्या नव्या वाटा चोखाळू लागले आहेत. पवनी तालुक्यातील आसेगाव येथील शेतकरी याच ध्येयाने एकत्र आले. त्यांनी चौरास शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. 

‘चौरास’ नेमके काय आहे? 
पवनी, लाखांदूर तालुक्‍यांतील जमीन सपाट किंवा समांतर असल्याने त्यास चौरस असे संबोधले जाते. त्याचेच पुढे नामकरण चौरासमध्ये झाले. आसगावात शेतकरी बचत गटांच्या बळकटीकरण योजनेतून सुमारे २० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी पुढाकार घेतला. ऊस लागवड क्षेत्रही पाहण्यास मिळते. गोसी खुर्द प्रकल्प, विहिरीच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी आहेत.

शेतकरी कंपनी : दृष्टिक्षेपात
कंपनीचे नाव- चौरास शेतकरी उत्पादक कंपनी
प्रति हजार रुपयांचा शेअर.
संचालक मंडळ- अनिल नौकरकर (कंपनी अध्यक्ष), किशोर पुंडलिक काटेखाये, खुशाल पडोळे, अमर बेंडारकर, मधुसुदन डोये, आशा कटाणे.  
सभासद- ७००
आसेगाव, पवनी व लाखांदूर, लाखनी तालुके. सोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी. 
सहकार्य - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. पी. लोखंडे, तालुका कृषी अधिकारी गजभिये, कृषी पणन तज्ज्ञ श्री. खिराळे.  
 
उपक्रम
भातरोवणी यंत्राचा वापर, भाडेतत्त्वावर देणे 
     त्याचे महत्त्व- या भागातील शेतकरी उन्हाळी, रब्बी हंगामात भात लागवड करतात. त्यासाठी मजूर उपलब्धता, वाढते मजुरी दर यामुळे भात उत्पादकांसमोरील संकटे वाढली आहेत. भात रोवणी यंत्र हा त्यावर पर्याय ठरू पाहत आहे. 

बीजप्रक्रिया उद्योग
ही शेतकरी कंपनी बीजोत्पादनातही सक्रिय आहे. 
राबविलेले प्रकल्प
सन २०१३- शंभर एकर- संकरित भात- खासगी बियाणे     कंपनीसोबत करार
सन २०१४- ८०० एकर, त्यापुढील वर्षी ४०० एकर
यंदा पुरेशा पाण्याअभावी बीजोत्पादन घेतले नाही.
बियाणे दर
खासगी कंपनी-  शेतकरी कंपनी
६००० रुपये प्रति क्विंटल

सीड प्रोसेसिंग प्लॅंट 
यंदा साडेनऊ लाख रुपये खर्चून उभारला. सात लाख रुपये शेअर्सच्या माध्यमातून जमा झाले. तर यंत्राद्वारे रोवणीच्या कामातून मिळालेल्या पैशांचाही या कामी विनियोग करण्यात आला. 
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून सुमारे साडेनऊ लाख रुपयांचे अनुदान 
कंपनीचे अध्यक्ष नौकरकर यांनी प्लॅंटसाठी २५ वर्षांसाठी सहा हजार रुपये प्रति महिना भाडेदराने आपली जागा दिली आहे. 
प्लॅंट उभारणीनंतर कंपनीला राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे सुमारे शंभर एकरांवर लाखोळी बीजोत्पादनाचे काम मिळाले आहे. सध्या कंपनीच्या सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे आहे. 

प्रस्तावित
स्वउत्पादित बियाणे विक्रीसाठी स्वतःचे आउटलेट उभारणार. संकरित धान वाणाचे सर्वाधिक क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे. त्या भागातून मोठ्या प्रमाणात बियाणे पुरविले जाते. त्या धर्तीवर आपल्या भागात असे उत्पादन का घेऊ नये, असा विचार करून शेतकरी कंपनीने काम सुरू केले.

अखेर यंत्र आले. वापरण्यास सुरवात
शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद
वर्ष : २०१५ 
नव्या भात रोवणी यंत्राची खरेदी. 
कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेतून नऊ लाख ८८ हजार रुपयांचे अनुदान. 

हे यंत्र कसे काम करते?

डिसेंबर, जानेवारीमध्ये रोपवाटिका (मॅट नर्सरी) 
पुनर्लागवड फेब्रुवारी व मार्च (उन्हाळी)
जुलै, ऑगस्टमध्येही रोवणी 

पारंपरिक रोवणी  
मजुरांमार्फत. एकरी खर्च साडेचार हजार रुपयांचा.
यात रोवणी योग्य, एकसमान होत नाही. मजुरांची संख्याही जास्त.
एकरी बियाणे २० किलो.
उत्पादन- एकरी ४ ते ५ क्विंटल. 

यांत्रिक रोवणी 
शेतकरी ‘एसआरआय’ तंत्र वापरतात. रोपे एकसमान पद्धतीने लावली जातात. रोवणीत फुटव्यांची संख्या अधिक मिळते. 
यंत्र चालवण्यासाठी दोन व्यक्ती. यंत्र चालविणारा व मॅट टाकणारा.    शेतापर्यंत मॅट ट्रे नेण्यासाठी ट्रॅक्‍टर. त्यासाठी दोन व्यक्‍ती. दोनशे रुपये    प्रति व्यक्‍ती प्रती दिवस याप्रमाणे मजुरी दर. 
दिवसाला सरासरी पाच एकर यानुसार दोन महिन्यांत २८० ते ३००    एकरांपर्यंत होते रोवणीचे काम.  
एकरी बियाणे १० किलो. म्हणजे बियाण्यात बचत.
एकूण व्यवस्थापनातून एकरी उत्पादन- १० क्विंटलपर्यंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news Farmer company in mechanical farming