हमीभावाने हरभरा खरेदी लवकरच - कृषी राज्यमंत्री शेखावत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - हरभऱ्याचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरातील मंदी हटविण्यासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र राज्यात हरभरा खेरदी सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली. 

राज्यमंत्री शेखावत म्हणाले, की मागील वर्षी देशांतर्गत हरभरा उत्पादन कमी झाले होते. परिणामी बाजारात हरभरा दर मोठ्या प्रमाणात वाढले होते.

नवी दिल्ली - हरभऱ्याचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरातील मंदी हटविण्यासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र राज्यात हरभरा खेरदी सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली. 

राज्यमंत्री शेखावत म्हणाले, की मागील वर्षी देशांतर्गत हरभरा उत्पादन कमी झाले होते. परिणामी बाजारात हरभरा दर मोठ्या प्रमाणात वाढले होते.

मागील वर्षी दर वाढल्याने शेतकऱ्यांचा ओढा यंदा हरभरा लागवडीकडे राहिला आहे. तसेच देशात मॉन्सून परतीच्या प्रवासात बराच काळ रेंगाळल्याने ज्या भागात खरीप पिके आली नव्हती, त्या भागात शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आहे. यंदा देशातील जवळपास ९ राज्यांमध्ये १०३.०९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांना निमकोटेड युरिया आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. सध्या काही प्रमाणात हरभरा पिकाची काढणी झाली असून, त्याची बाजारात विक्रिसुद्धा होत आहे. 

‘‘शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क लावले होते. तसेच २००६ पासून भारतातून हरभरा निर्यात बंद होती आणि आयात शुल्क शून्य होते, जे सरकारने नुकतेच ४० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. तरीही हरभरा हमीभावाने विकला जात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमतीशी स्पर्धा करण्यासाठी सरकार निर्यात अनुदान देण्याच्या विचारात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळेल,’’ असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांना भेटून निवेदन दिले. मागील वर्षी महाराष्ट्रात १३ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती, ती यंदा २० लाख हेक्टरवर झाली आहे आणि हरभरा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तातडीने हमीभावाने हरभरा खेरदी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली.  केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी लवकरच महाराष्ट्रात हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करणार असल्याचे अाश्वासन श्री. पटेल यांना दिले आहे. तसेच निर्यात अनुदानासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news harbhara gram purchasing minimum support price gajendrasinh shekhawat