शेतीत भांडवली गुंतवणूक वाढली - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 December 2017

मोशी, पिंपरी- चिंचवड - शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप सरकारच्या वतीने शेतीक्षेत्राचे बजेट २० हजार काेटींवरून ६१ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविले आहे. यामुळे शेतीत भांडवली गुंतवणूक वाढली आहे. सरकारच्या माध्यमातून सिंचनासह शेतीसाठी विविध योजना रावबिण्यात येत आहे. तसेच शेतकरी कर्जमुक्तही हाेत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, हे सरकारचे यशच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोशी येथील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजार आवारात आयाेजित शेतकरी तांदूळ महोत्सव, देशी गाई, स्पर्धा, प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात बापट बाेलत हाेते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे, उपमुख्य प्रशासक भूषण तुपे, संचालक एकनाथ टिळे, संतोष खांदवे, गाेरख दगडे, राजेंद्र कोरपे, मंगेश मोडक, अण्णा शिंदे, प्रताप चव्हाण, दादासाहेब घाटे, क्रातीताई सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री शिवतारे म्हणाले, ‘हिंदू धर्मामध्ये देशी गाईंचे पावित्र्य आणि महत्त्व असामान्य आहे. या गाईंचे संवर्धन, प्रचार व प्रसार यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने देशी गाईंचे भरविलेले हे प्रदर्शन हे शेतकरी आणि नागरिकांना देशी गाेवंशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 

तांदूळ महोत्सवामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातसडीचा इंद्रायणी, कोलम, बासमती तांदूळ, सेंद्रिय गूळ, काकवी, गाईंचे दूध, गोमूत्र, शेण आदींपासून बनविलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले असून विविध प्रकारच्या २०० हून अधिक देशी गाई या स्पर्धा-प्रदर्शनामध्ये सहभागी केल्या आहेत. उद्या रविवार (ता.३) पर्यंत सुरू असणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news investment increase in agriculture capital